शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 00:10 IST

कोविड संक्रमणामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जात आहे. याचा विचार करता ‘लर्निंग फ्रॉम होम’ संकल्पनेंतर्गत मनपा शाळातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅन्ड्रॉईड टॅबलेट उपलब्ध करण्याची योजना शिक्षण विभागाने तयार केली आहे. या प्रकल्पाला एज्युकेशन टॅब बँक असे नाव दिले आहे.

ठळक मुद्दे ऑनलाईन शिक्षणासाठी एज्युकेशन टॅब बँक योजना२.४९ कोटींचा खर्च, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड संक्रमणामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जात आहे. याचा विचार करता ‘लर्निंग फ्रॉम होम’संकल्पनेंतर्गत मनपा शाळातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅन्ड्रॉईड टॅबलेट उपलब्ध करण्याची योजना शिक्षण विभागाने तयार केली आहे. या प्रकल्पाला एज्युकेशन टॅब बँक असे नाव दिले आहे.या प्रकल्पांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. सध्या मनपा शाळात इयत्ता दहावीत १७२३ तर बारावीत २१५ विद्यार्थी आहेत. दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन शिक्षणाची नितांत गरज आहे. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करता शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची योजना तयार केली आहे.याबाबतचा प्रस्ताव तयार करून १९५० टॅब खरेदी करण्यात येईल. प्रति टॅब १०,९८८ रुपये याप्रमाणे मनपाला यावर २ कोटी ४९ लाख ५६ हजार १०० रुपये खर्च करावा लागेल. प्रति टॅब संचालित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना दर महिन्याला १५० रुपये खर्च करावा लागेल. यावर मनपाला ३५.१० लाख खर्च रुपये खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना दररोज १.५ जीबी डाटा उपलब्ध करावा लागेल. या प्रकल्पावर २ कोटी ४९ लाख ५६ हजार १०० रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळते की नाही, याकडे लक्ष लागले आहे.ई-लर्निंग सॉफ्टवेअर उपलब्ध होणारटॅबमध्ये केंद्र व राज्य सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या ई-लर्निंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात येईल. राज्य सरकारतर्फे दीक्षा व केंद्र सरकारतर्फे एमएचआरडी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. ई-बालभारती, बोलकी बालभारती, आठवी ते दहावी विज्ञान, भूगोल, संस्कृतचे व्हिडिओ, बालभारती यूट्यूब चॅनल, किशोर मासिक आधी साहित्य उपलब्ध होईल.वर्षाच्या खर्चासाठी तरतूदप्रति टॅब दरवर्षी १५०० रुपये खर्चाचा अंदाज आहे. याचा विचार करता एका वर्षात त्यासाठी २९.२५ लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. देखभाल व नेट पॅक यावर वर्षाला खर्च होणारे ६४.३५ लाख रुपये शिक्षण विभागाच्या कॉम्प्युटर, प्रिंटर्स, झेरॉक्स व अन्य खरेदी, दुरुस्ती यातून तरतूद करण्याची मागणी स्थायी समितीकडे केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाStudentविद्यार्थीtabletटॅबलेट