शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने पीएफचे ७२ कोटी जमाच केले नाहीत : चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 20:14 IST

महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ७२ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी प्रमुख लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्दे मृताच्या वारसांना लाभ मिळण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ७२ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी प्रमुख लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत.महाराष्ट्र शासनातर्फे तीन वर्षासाठी काही अधिकाऱ्यांना महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते. २०१० ला प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेले तत्कालीन प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे नोव्हेंबर २०१७ पर्यंत कार्यरत होते. या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला भविष्य निर्वाह निधीकर्मचारी अंशदान पेन्शन योजनेची रक्कम बँकेत जमा केलेली नाही. यामुळे कर्मचारी व शिक्षकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.गाडगे यांनी भविष्य निर्वाह निधीचे ५१ कोटी तर अंशदान पेन्शन योजनेचे कपात केलेले ३७ कोटी व मनपाचा वाटा ३७ कोटी अशी ७२ कोटींची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे या रकमेवर व्याजही मिळत नाही. तसेच एलआयसीत रक्कम वेळेवर न भरल्यामुळे दंड भरावा लागला. या कालावधीत गट विमा न भरल्याने १२ मृत कर्मचारी व शिक्षकांच्या वारसांना नियमाप्रमाणे संपूर्ण रक्कम मिळाली नाही. कर्मचाऱ्यांच्या पैशाचा अपहार करण्यात आला. गाडगे यांच्या कार्यकाळात मनपा कर्जबाजारी झाली. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे व जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे यांनी मुखयमंत्री उद्धव ठाकरे व मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार निर्भय जैन यांनी वित्त विभागाला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाProvident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारी