शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आता संशयित रुग्णांचे नमुने घरी जाऊनच घेणार  : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 20:58 IST

आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील.

ठळक मुद्देसंशयित रुग्णांचे घरीच विलगीकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील. तेव्हापर्यंत त्यांनी घरीच एका वेगळ्या स्वतंत्र खोलीत स्वत:ला १४ दिवस इतरांपासून ठेवून घ्यावे. दरम्यान, यापैकी ज्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले त्यांना रुग्णालयात हलवले जाईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून येत असतील तर त्या व्यक्तीने घरातच स्वत:ला १४ दिवस इतरांपासून दूर ठेवण्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणे वाटल्यास जिल्हा प्रशासनाच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधावा. हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. डॉक्टरांचा सहभाग असलेली तज्ज्ञ प्रशासनाची चमूच तुमच्या घरी येईल. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांवर नागपुरातील मेयो व मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांत वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आलेले आहे. त्यांना रुग्णालयात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोयी पुरविण्यात येत आहेत, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.मेयोतील त्या चारपैकी तीन संशयित रुग्ण परतलेरुग्णालयात दाखल होऊन परत गेलेल्या संशयित रुग्णांशी संपर्क झाला असून, त्यापैकी तिघेजण रुग्णालयात परतले आहेत. यापैकी उर्वरित एकजण परत येत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. नागपुरातील मेयो रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले हे ४ संशयित शासकीय मेयो रुग्णालयात दाखल होते. या चारही संशयितांचा अहवाल आज शनिवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत येणार होता. त्यापूर्वीच हे चारही जण काल मध्यरात्री रुग्णालयातून घरी परत गेले होते. तिघांपैकी एकाच्या लहान मुलीला ताप होता. त्यामुळे तो रुग्णालयात थांबू शकत नव्हता, असे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.पोलीस यंत्रणेची मदत घेणारमेयो आणि मेडिकलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल रात्रीसारखा प्रकार पुन्हा घडू नये, याची जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्ण खबरदारी घेत आहे. रात्री घरी परत जाणाऱ्या संशयित रुग्णांना डॉक्टर व परिचारिकांनी थांबण्याची विनंती केली. मात्र रुग्ण घरी निघून गेले. जिल्हा प्रशासनाला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता पोलीस तैनात करणार असल्याचे सांगून, पोलीस यंत्रणेचीही मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोनाcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरMediaमाध्यमे