शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; नागपुरातील मेयो व मेडिकलमध्ये ‘पीपीई’ किटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:12 IST

प्राप्त माहितीनुसार, मेयो, मेडिकलने वैद्यकीय शिक्षण विभागाला या किटची मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत.

ठळक मुद्देमागितले हजार मिळाले १००रुग्ण वाढल्यास अडचणी वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचीलागण झालेल्या रुग्णांची संख्या सध्या स्थिर आहे. परंतु संशयित रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. या रुग्णांना सेवा देणाऱ्यांसाठी ‘पीपीई’ म्हणजे ‘पसर्नल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ किट गरज असते. परंतु मागणीच्या तुलनेत फारच कमी पुरवठा होत आहे. प्राप्त माहितीनुसार, मेयो, मेडिकलने वैद्यकीय शिक्षण विभागाला या किटची मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. स्थानिक पुरवठादाराकडे हजार किटची मागणी केली असता त्यांच्याकडून केवळ १०० किट मिळाल्या आहेत. यामुळे अचानक रुग्ण वाढल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) कोरोनाबाधित रुग्णांसाठी २० खाटांचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. सध्या येते एक पॉझिटिव्ह तर पाच संशयित रुग्ण आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४० खाटांचा वॉर्ड आहे. येथे तीन पॉझिटिव्ह तर १० संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना किंवा वॉर्डात काम करणाऱ्या डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांना ‘पीपीई’ किट घालणे आवश्यक असते, अन्यथा त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. मेयो, मेडिकलने स्थानिक पुरवठादाराकडून या किटची खरेदी केली आहे. परंतु पुरेशा प्रमाणात त्यांच्याकडेही उपलब्ध नसल्याने मोजक्याच मिळाल्या आहेत. यातच एक किटची किमत दीड हजाराच्या घरात आहे. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात खरेदी करणेही रुग्णालयांना शक्य नाही. यासाठी आठवड्यापूर्वी दोन्ही रुग्णालयांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला हाफकिन कंपनीकडून किट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्यापही किट मिळालेल्या नाहीत.

अशी आहे किट‘पसर्नल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ किटमध्ये संपूर्ण शरीर झाकले जाईल असा गाऊन असतो. सोबत शू कव्हर, डोक्यासाठी कॅप, तोंडावर लावण्याचे मास्क, सुरक्षित गॉगल आणि हॅन्डग्लोव्हज असतात. एका किटची किंमत सुमारे दीड हजाराच्या घरात आहे.

रोज लागतात १५ वर किटमेयो, मेडिकलमध्ये तीन शिफ्टमध्ये एक डॉक्टर, एक परिचारिका व एक कर्मचाऱ्यांची चमू असते. यामुळे २४ तासासाठी कमीत कमी नऊ किटच गरज पडते. यातच वरिष्ठ डॉक्टर किंवा इतरांची सेवा घ्यायची असल्यास त्यांनाही ही किट उपलब्ध करून द्यावी लागते. यामुळे रोज १५ वर किट लागत आहेत. एकदा वापरलेली किट पुन्हा वापरता येत नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस