शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांकडून कुठलीही सावधगिरी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:05 IST

सर्वत्र भीतियुक्त वातावरण असताना खाद्यपदार्थ विक्रेते मात्र कुठलीही सावधगिरी न बाळगता खाद्यपदार्थाची विक्री करीत आहे. विशेष म्हणजे नागपूरकरही बिनधास्तपणे त्यावर ताव मारत असल्याचे शहरात चित्र आहे.

ठळक मुद्देनागपूरकरही बिनधास्त मारताहेत तावशहरात कोरोना अलर्ट

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. मॉल, थिएटर, सभागृह, मंगल कार्यालय या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. सर्वत्र भीतियुक्त वातावरण असताना खाद्यपदार्थ विक्रेते मात्र कुठलीही सावधगिरी न बाळगता खाद्यपदार्थाची विक्री करीत आहे. विशेष म्हणजे नागपूरकरही बिनधास्तपणे त्यावर ताव मारत असल्याचे शहरात चित्र आहे.शहरातील रस्त्यावर मोठ्या संख्येने खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल लागलेले आहेत. या स्टॉलवर खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री होत आहे. खाद्यपदार्थ विक्री करताना विक्रेते कुठलीही खबरदारी बाळगताना दिसत नाहीत. आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता बाळगण्याचे, वारंवार हात धुण्याचे, बाहेर पडताना तोंड झाक ण्याचे आवाहन केले जात आहे. असे असतानाही खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या तोंडावर कुठलाही मास्क नाही. तासन्तास हात धुतले जात नाहीत. स्वच्छतेबाबतही गंभीरता नाही.अशा अवस्थेत लोकही गर्दी करून पदार्थाचे उघड्यावर सेवन करीत आहेत. एवढेच नव्हे तर काही रेस्टॉरेंटमध्येही खाद्य पदार्थ विक्री करताना कुठलीही सावधगिरी बाळगताना दिसत नाहीत. रेस्टॉरेंटमधील वेटरला मास्क नाही, हात धुतले जातात की नाही याचीही खबरदारी घेतली जात नाही. यावर मालकांचाही अंकुश नाही.आरोग्य विभागाकडून सातत्याने हा संसर्गजन्य आजार असल्याचे सांगण्यात येत आहे. सावधगिरी बाळगणे हा एकमेव पर्याय आहे. ज्यामुळे आजारावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. त्यामुळे विक्रेते असो की, खाणारे यांनी किमान या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे.नामांकित हॉटेलमध्ये सावधगिरीशहरातील नामांकित हॉटेलमध्ये कोरोनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगल्या जात आहे. हॉटेलच्या रिसेप्शनवर असणारे कर्मचारी तोंडाला मास्क लावून आढळले. शिवाय काऊंटरवरच सॅनिटायझरची बॉटलसुद्धा आढळून आली. काही नामांकित हॉटेलमध्ये कर्मचारी तोंडाला मास्क बांधून साहित्याची विक्री करीत होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस