शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी दोन पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 20:47 IST

एक दिवसाच्या उसंतीनंतर गुरुवारी आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. गिट्टीखदान येथील रहिवासी २५ वर्षीय युवकाची अजमेर प्रवासाची तर तारसा, कन्हान येथील रहिवासी ६१ वर्षीय व्यक्तीच दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे.

ठळक मुद्देदोघांपैकी एकाची अजमेर तर दुसऱ्याची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक दिवसाच्या उसंतीनंतर गुरुवारी आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. गिट्टीखदान येथील रहिवासी २५ वर्षीय युवकाची अजमेर प्रवासाची तर तारसा, कन्हान येथील रहिवासी ६१ वर्षीय व्यक्तीच दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे. हे दोन्ही रुग्ण गेल्या १४ दिवसापासून रविभवन येथे क्वारंटाइन होते. या रुग्णासह नागपुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८ झाली आहे. दिवसभरात तपासण्यात आलेल्या नमुन्यात १४६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ११ ते १४ एप्रिलदरम्यान सर्वाधिक ३१ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. १५ एप्रिल रोजी मात्र एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहिसा कमी झाला. परंतु गुरुवारी पुन्हा दोन नमुन्याचा अहवाल कोरोनाबाधित आला. यातील एक गिट्टीखदान तर दुसरा रुग्ण तारसा, कन्हान येथील आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही रुग्णांना २ एप्रिल रोजी क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापूर्वी ते काही दिवस आपल्या घरी असावेत. यामुळे यंत्रणेला दोघांच्या रहिवासी परिसरात परिश्रम घ्यावे लागणार आहे.एम्स, मेडिकल व मेयोने तपासले १५० नमुनेअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७० नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील ४१ तर अमरावती जिल्ह्यातील २९ नमुन्यांचा समावेश होता. दोन्ही जिल्ह्यातील एक-एक नमुना पुन्हा तपसणीसाठी पाठविण्यात आला. उर्वरीत ६८ नमुने निगेटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) याच वेळेपर्यंत केवळ ३२ नमुने तपासले. यात आमदार निवास व मेडिकलमधील संशयित रुग्णांचे नमुने होते. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ४८ नमुने तपासले. हे सर्व नमुने रविभवन येथील संशयितांचे होते. यातील दोन पॉझिटिव्ह तर उर्वरीत ४६ नमुने निगेटिव्ह आले. एकूण १५० नमुने तपासण्यात आले असून १४६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.त्या दोन्ही रुग्णाचे पहिले नमुने निगेटिव्हपॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही रुग्णाला २ एप्रिल रोजी रविभवन येथील अलगीकरण कक्षात दाखल केले. त्यापूर्वी त्यांना मेयोत भरती करून नमुने तपासण्यात आले. यात दोघेही निगेटिव्ह आले होते. परंतु प्रवासाचा इतिहास असल्याने रविभवनात १४ दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात आले. आज नमुने पॉझिटिव्ह आल्याने आता पुन्हा १४ दिवस रुग्णालयात रहावे लागणार आहे. डॉक्टरांच्या मते त्यांना कुठलीही लक्षणे नाहीत. रविभवनातून ३५ संशयितांना घरी पाठविलेसंस्थात्मक अलगीकरण कक्षात २ एप्रिलपासून रविभवनाचा समावेश झाला. यात ७६ संशयितांना ठेवण्यात आले होते. यातील ४८ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. दोन पॉझिटिव्हसह ४६ नमुने निगेटिव्ह आले. यात दुसऱ्यांदा तपासणी करून निगेटिव्ह आलेल्या ३५ संशयितांना घरी पाठविण्यात आले. पुढील १४ दिवस त्यांना होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ५०दैनिक तपासणी नमुने १५०दैनिक निगेटिव्ह नमुने १४६नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५८नागपुरातील मृत्यू ०१डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १०४८कॉरन्टाईन कक्षात एकूण संशयित ५६०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर