शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 23:11 IST

Corona Virus, Nagpur Newsकोरोनाचे थैमान हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. मृतांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. शुक्रवारी शहरात १३, ग्रामीणमध्ये सात तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्णांचे असे एकूण २६ मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्दे१,२७१ रुग्ण कोरोनामुक्त : ६३६ पॉझिटिव्ह तर २६ रुग्णांच्या मृत्यूची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे थैमान हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. मृतांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. शुक्रवारी शहरात १३, ग्रामीणमध्ये सात तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्णांचे असे एकूण २६ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, आज चाचण्यांची संख्या ६,८०९ वर गेली असताना मागील सात दिवसांच्या तुलनेत सर्वात कमी, ६३६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर त्याच्या दुप्पट, १२७१ कोरोनाबाधित बरे झाले. रुग्णांची एकूणसंख्या ८५,४६३ झाली असून मृतांची संख्या २,७५० वर पोहचली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सण, उत्सवाच्या तोंडावर कमी होऊ लागला आहे. यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु खबरदारी अपेक्षित असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. नागपूर जिल्ह्यात आज चाचण्यांची संख्या वाढली. ३५१२ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. यात ४०३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३२९७ रुग्णांच्या झालेल्या रॅपिड अँटिजेन चाचणीत २३३ रुग्ण निगेटिव्ह आले. मागील दीड महिन्याच्या कालावधीत ही संख्या पहिल्यांदाच समोर आली आहे. एम्सच्या प्रयोगशाळेतील ३४० चाचण्यांमधून ३७, मेडिकलच्या प्रयोगशाळेतील ५६५ चाचण्यांमधून १२, मेयोच्या प्रयोगशाळेतील ३९४ चाचण्यामधून ४०, माफसूच्या प्रयोगशाळेतील १३८ चाचण्यामधून २३, नीरीच्या प्रयोगशाळेतील २५७ चाचण्यामधून ६१ तर खासगी लॅबमधील १८०६ चाचण्यामधून २३० रुग्ण पॉझिटिव्ह आले.रुग्ण बरे होण्याचा दर ८६ टक्क्यांवरसप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्क्यांवर असताना आता तो ८६.४५ टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत शहरातील ५९,११६ व ग्रामीणमधील १४,७६९ असे एकूण ७३,८८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या शहरातील ५,८९७ व ग्रामीणमधील २,९३१ असे एकूण ८,८२८ रुग्ण उपचाराखाली आहेत. रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा दरही ७९.१ दिवसांवर गेला आहे.मेयोत बाधितांची संख्या २००च्याखालीऑगस्ट महिन्यापासून वेग धरलेल्या बाधितांच्या संख्येमुळे सप्टेंबर महिन्यात मेयो, मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलच्या ६०० खाटा कमी पडू लागल्या होत्या. परंतु मेयोमध्ये आता २००च्या खाली, १६८ रुग्ण उपचार घेत आहेत. मेडिकलमध्ये २६६ तर एम्समध्ये ३२ रुग्ण भरती आहेत. काही खासगी हॉस्पिटलमध्येही रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.९३ वर्षाच्या वृद्धाने केली कोरोनावर मातमहानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगरमधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पद्माकर चवडे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते.कोरोनाचा प्रादुर्भाव नागपुरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहज मात करता येते, असे पद्माकर चवडे यांनी दाखवून दिले आहे. पद्माकर चवडे यांना कोविड - १९ ची लक्षणे दिसल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मेयो रुग्णालयामध्ये ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर येथे भरती करण्यात आले. आई.जी.आर मध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉ. हरदास यांनी सांगितले की, त्यांना आॅक्सिजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी १०० हून अधिक बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केला जात आहे. सध्या ४१ रुग्णांना उपचार घेत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी आई.जी.आर चे डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन केले आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,८०९बाधित रुग्ण : ८५,४६३बरे झालेले : ७३,८८५उपचार घेत असलेले रुग्ण : ८,८२८मृत्यू : २,७५०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर