शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

CoronaVirus in Nagpur : आकडे वाढल्याने टेस्ट तर कमी केल्या नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 00:08 IST

नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लागल्याचे चित्र दाखविण्यात येत आहे. संक्रमितांची संख्या प्रशासनाकडून कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी कोरोनाच्या जेवढ्या टेस्ट होत होत्या, त्यात घट झाली असून, ते ५० ते ६० टक्क्यावर आली आहे. प्रशासनाने आकडे वाढल्याचे पाहून टेस्ट कमी तर केल्या नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे असेल तर कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी हा प्रकार योग्य ठरणार नाही.

ठळक मुद्देटेस्टची संख्या घटली : पॉझिटिव्हही हजाराच्या आत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लागल्याचे चित्र दाखविण्यात येत आहे. संक्रमितांची संख्या प्रशासनाकडून कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी कोरोनाच्या जेवढ्या टेस्ट होत होत्या, त्यात घट झाली असून, ते ५० ते ६० टक्क्यावर आली आहे. प्रशासनाने आकडे वाढल्याचे पाहून टेस्ट कमी तर केल्या नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे असेल तर कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी हा प्रकार योग्य ठरणार नाही.सोमवारी नागपूर जिल्ह्यात ९९४ पॉझिटिव्ह मिळाले. त्या तुलनेत टेस्टसुद्धा २७०१ झाल्या. यातून शहरात १,७६४ तर ग्रामीणमध्ये ९३७ टेस्ट झाल्या. सप्टेंबरच्या मध्यंतरात किमान ७ ते ८ हजार टेस्ट दररोज होत होत्या. त्यात आता घट झाली असून ३ ते ५ हजारापर्यंत आल्या आहेत. जाणकारांच्या मते टेस्ट वाढल्या तरच कोरोनावर अंकुश लावण्यात यश मिळेल. परंतु प्रशासनाने संक्रमण कमी दाखविण्यासाठी टेस्टच कमी केल्या आहेत.सप्टेंबरच्या २८ दिवसातील आकड्यांकडे बघितल्यास यात ४६,२६० संक्रमित आढळले. दरम्यानच्या अवधीत १ लाख ८२ हजार ९२८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २५.२८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते की विकेंडदरम्यान टेस्ट कमी होतात.९९४ नवीन पॉझिटिव्ह, ३८ मृत्यूनागपूर जिल्ह्यात सोमवारी ९९४ नवीन पॉझिटिव्ह मिळाले. तर ३८ संक्रमितांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्हमध्ये शहरातील ७४३, ग्रामीणमध्ये २४७ व जिल्ह्याच्या बाहेरील ४ लोकांचा समावेश आहे. पॉझिटिव्हची एकूण संख्या ७५,८१५ व मृतांची संख्या २,४३८ झाली आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६०,२९१, ग्रामीण १५,१०७ व जिल्ह्याबाहेरील ४१७ आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये शहरातील १,७८१, ग्रामीण ४२२ व जिल्ह्याबाहेरील २३५ लोकांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८४५ नमुने तपासण्यात आले आहेत. सोमवारी खासगी लॅबमधून २८७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये २९७, एम्सच्या लॅबमधून ५३, मेडिकलच्या लॅबमधून ११०, मेयो येथून १८०, नीरी येथून ६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.१,४३१ कोरोनामुक्तनागपूर जिल्ह्यात सोमवारी १,४३१ पॉझिटिव्ह कोरोनामुक्त झाले. यात शहरातील १,१५० व ग्रामीण भागातील २८१ लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५९,६९७ संक्रमित कोरोनामुक्त झाले आहेत. निरोगी होण्याचा दर ७८.७४ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर