शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

CoronaVirus in Nagpur : रेकॉर्ड! नागपुरात तब्बल २२२ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:35 IST

एकाच दिवसात कोरोनाचे २२२ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सर्वाधिक, १८३ रुग्ण याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळून आले होते. विशेष म्हणजे, तीन दिवसात रुग्णसंख्येने ५००चा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ३६८७ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंतचा मोठा स्फोट : पाच रुग्णांचा मृत्यूग्रामीणमधील ७१ तर शहरामधील १५१ रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एकाच दिवसात कोरोनाचे २२२ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सर्वाधिक, १८३ रुग्ण याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळून आले होते. विशेष म्हणजे, तीन दिवसात रुग्णसंख्येने ५००चा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ३६८७ वर पोहचली आहे. शिवाय, पाच रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ७० झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीणमधील ७१ तर शहरामधील १५१ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ३० जूनपर्यंत २५ मृतांची नोंद होती. या महिन्यात गेल्या २४ दिवसात ४५ मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी मृत्यू झालेल्यांमध्ये मेयोमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. यातील एक ६२ वर्षीय पुरुष अचलपूर अमरावती येथील होता. या रुग्णाचा मृत्यू २३ जुलै रोजी पहाटे झाला. रुग्णाला फुफ्फुसाच्या आजारासोबतच उच्चरक्तदाब, टाईप टू मधुमेह आणि न्यूमोनिया झाला होता. दुसरा ३५ वर्षाचा अनोळखी पुरुष रुग्ण होता. जबर जखमी अवस्थेत या रुग्णाला २३ जुलै रोजी मेयोत आणले होते, उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मात्र, त्याचा नमुना तपासला असता तो पॉझिटिव्ह आला. ही धक्कादायक बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. झिंगाबाई टाकळी येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाला २१ जुलै रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे मृत्यू झाला. या रुग्णाला उच्चरक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, न्यूमोनिया आदी आजारही होते. उर्वरीत दोन मृत्यूची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून उपलब्ध झाली नाही. एकूण ७० रुग्णांच्या मृत्यूमध्ये ११ ग्रामीण, ४१ शहरातील, १८ जिल्ह्याबाहेरील आहेत.रॅपिड अ‍ॅण्टीजन चाचणीत ४५ रुग्ण पॉझिटिव्हरॅपिड अ‍ॅण्टीजन चाचणीत ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय, मेयोच्या प्रयोगशाळेतून ३५, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून २५, एम्सच्या प्रयोगशाळेतून ४०, नीरीच्या प्रयोगशाळेतून १३, माफसूच्या प्रयोगशाळेतून २७, खासगी लॅबमधून ३७ असे मिळून २२२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज मेयो, मेडिकल, एम्स व सीसीसीमधून ९४ रुग्णांना सुटी देण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या २३०७ झाली आहे. १३१० रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, ही समाधानकारक बाब आहे.या वसाहतीत आढळले रुग्णमनपाच्या आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मदिना अपार्टमेट ४, वाठोडा २, मानकापूर २,स्वीपर कॉलनी १, हिंगणा रोड २, चिखली १, राजीवनगर १, पाचपावली २, नंदनवन १४, भानखेडा २, बाभुळखेडा १, कळमना ४, सोमवारी क्वॉर्टर २, कुमारी कॉलनी १, दत्तात्रयनगर १, मानेवाडा १, साईनगर १, मेडिकल परिसर ४, भोईपुरा २, महाल २, टेलिफोननगर ४, बजेरिया १, मंगळवारी ५, देवतळे वाडा १, जांबभोळेनगर १, सेमिनरी हील्स २, माहुली १, गोळीबार चौक ३, नारा २, मोहनगर १, गोरेवाडा १, चंद्रनगर ९, गणेशपेठ २, लक्ष्मीनगर ४, अयप्पा मंदिर परिसर १, टेकानाका २, ताजबाग २, न्यू शुक्रवारी १, निर्मिती हाईट बिल्डिंग १, लकडगंज १, बारसेनगर १, इंदिरा गांधीनगर १, गोरेवाडा चौक १, डागा ले-आऊट १, भेंडे ले-आऊट २, धंतोली १, जयताळा १, गांधीनगर १, राणीदुर्गावतीनगर पंचशील नगर १, स्नेहनगर १, न्यू शुक्रवारी १, छापरुनर १, चिंचभवन २, यशोदानगर ३, पारडी १, मिनीमातानगर १, काचीपुरा २, दुबेनगर १, न्यू डायमंड नगर ५, रामबाग कॉलनी मेडिकल चौक १, विनोबा भावेनगर १, ब्लॉसम अपार्टमेंट १, सोमलवाडा १, रघुजीनगर ३, सुदामनगर १, रमणा मारुती १, बहादुरा फाटा १, यमुनानगर २, मरीयमनगर १, त्रिमूर्तीनगर १, टिमकी ३, अजनी १ अशा १३९ रुग्णांचा समावेश आहे.कामठीत ३६ रुग्ण पॉझिटिव्हकामठी तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. आज ३६ रुग्णांची नोंद झाली. या शिवाय, कन्हान येथील सहा, काटोल येथील तीन, डोडमा (ता. कुही) येथील दोन तसेच खापरखेडा, सुराबर्डी (वाडी), परसोडी (ता. कळमेश्वर), खंडाळा (नरखेड), मौदा व नगरधन (ता. रामटेक) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.दैनिक संशयित :२८३बाधित रुग्ण : ३६८७घरी सोडलेले : २३०७उपचार घेत असलेले रुग्ण : १३१०मृत्यू : ७०

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर