शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

CoronaVirus in Nagpur : नागपूरचा संक्रमण दर राष्ट्रीय दरापेक्षा दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 00:01 IST

Corona Virus , Nagpur Newsनागपूर जिल्ह्यात १४ ऑक्टोबरपर्यंत एकूण ५ लाख ३५ हजार ५४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १६.५२ टक्के अर्थात ८८,४९९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. देशभरात मंगळवारपर्यंत एकूण ९ कोटी ९० हजार १२२ नमुने तपासण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर संक्रमणाचा दर ८.०४ टक्के आहे. यावरून राष्ट्रीय संक्रमण दराच्या तुलनेत नागपुरातील संक्रमणाचा दर दुपटीहून अधिक असल्याचे स्पष्ट होते.

ठळक मुद्देजिल्ह्यात ५.३५ लाख नमुन्यांची तपासणी १६.५२ टक्के पॉझिटिव्ह

राजीव सिंह / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात १४ ऑक्टोबरपर्यंत एकूण ५ लाख ३५ हजार ५४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १६.५२ टक्के अर्थात ८८,४९९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. देशभरात मंगळवारपर्यंत एकूण ९ कोटी ९० हजार १२२ नमुने तपासण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर संक्रमणाचा दर ८.०४ टक्के आहे. यावरून राष्ट्रीय संक्रमण दराच्या तुलनेत नागपुरातील संक्रमणाचा दर दुपटीहून अधिक असल्याचे स्पष्ट होते. नागपुरात ऑक्टोबरच्या १४ दिवसांमध्ये संक्रमणाचा दर १२.४९ टक्क्यापर्यंत घसरला, हे उल्लेखनीय.

नागपुरात ११ मार्च रोजी पहिला कोरोना संक्रमित रुग्ण आढळला. त्यानंतर संसर्ग वाढत गेला. सप्टेंबर महिन्यात २४.६३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. अर्थात, तपासणी करणारा प्रत्येक चौथा व्यक्ती पॉझिटिव्ह होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये संक्रमण आवाक्यात राहिले. १४ ऑक्टोबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण संक्रमितांची संख्या ८८,४९९ होती. ऑक्टोबर महिन्यात १४ दिवसात ८३,९०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १०,४८७ रुग्ण पॉझिटिव्ह होते.

विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये तब्बल ४८,४५७ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आणि संक्रमणामुळे १,४६५ मृत्यूंची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये १ लाख ९६ हजार ७२२ नमुने तपासण्यात आले होते. यापूर्वी मार्चमध्ये ६६६ नमुन्यांची तपासणी झाली. त्यात १६ रुग्ण संक्रमित होते. मार्चमध्ये संक्रमणाचा दर २.४० टक्के होता. एप्रिलमध्ये तपासण्यात आलेल्या २,२७२ नमुन्यांमध्ये १२३ (५.४१ टक्के), मे महिन्यात ९,१७१ नमुन्यांतून ३९२ (४.२७ टक्के), जूनमध्ये १२,३९१ मधून ९७२ (७.८४ टक्के), जुलैमध्ये ५५,१०० नमुन्यांतून ३,८८९ (७.०५ टक्के) आणि ऑगस्टमध्ये तपासण्यात आलेल्या १,७५,३१७ नमुन्यांमधील २४,१६३ (१३.७८ टक्के) नमुने संक्रमित आले.

आरटी-पीसीआर टेस्ट अधिक

 नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील ३ लाख ९१ हजार २५५ आणि ग्रामीणमध्ये १ लाख ४४ हजार २८५ नमुने तपासण्यात आले. यात आरटी-पीसीआर टेस्ट २ लाख ८८ हजार ५३९ आणि ॲन्टिजेन टेस्ट २ लाख ४७ हजार १ करण्यात आले.

६०९ नवे संक्रमित, २९ मृत्यू

 नागपूर जिल्ह्यात बुधवारी ६०९ नवीन संक्रमित आढळले आणि २९ मृत्यूची नोंद झाली. नव्या संक्रमितांमध्ये शहरातील ४०३, ग्रामीणमधून १९७ आणि जिल्ह्याबाहेरील ९ रुग्णांचा समावेश आहे तर मृतांमध्ये शहरातून ११, ग्रामीणमधून ९ आणि जिल्ह्याबाहेरील ९ संक्रमितांचा समावेश आहे. एकूण संक्रमितांची संख्या ८८,४९९ झाली आहे आणि एकूण मृत्यूंची संख्या २,८६९ इतकी झाली आहे. बुधवारी ७४३ रुग्ण संक्रमणमुक्त झाले. त्यात ४७७ शहरातील आणि ग्रामीणमधील २६६ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७८,२१४ रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. रिकव्हरी रेट ८८.३८ पर्यंत पोहोचला आहे. गेल्या २४ तासात ५४२८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

एकूण आकडेवारी

अ‍ॅक्टिव्ह - ७,४१६

संक्रमणमुक्त - ७८,२१४

मृत्यू - २,८६९

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर