CoronaVirus in Nagpur : मनपा परिवहन विभागाला कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:02 PM2020-03-31T21:02:05+5:302020-03-31T21:04:16+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोेषित करण्यात आला आहे. २२ मार्चपासून आपली बससेवा बंद असल्याने ३६५ बसेस उभ्या आहेत. बंदमुळे उत्पन्न बुडाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

CoronaVirus in Nagpur: Municipal Transport Department hit by Millions | CoronaVirus in Nagpur : मनपा परिवहन विभागाला कोट्यवधींचा फटका

CoronaVirus in Nagpur : मनपा परिवहन विभागाला कोट्यवधींचा फटका

Next
ठळक मुद्देलॉकडाऊ नमुळे उत्पन्न बुडाले : कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोेषित करण्यात आला आहे. २२ मार्चपासून आपली बससेवा बंद असल्याने ३६५ बसेस उभ्या आहेत. बंदमुळे उत्पन्न बुडाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.
शहरात दररोज ३६५ बसेस धावतात. यातून सुमारे १ लाख ७० हजार प्रवासी प्रवास करतात. तिकिटातून महापालिकेच्या तिजोरीत दररोज २५ ते २७ कोटींचा महसूल जमा होतो. २२ मार्चपासून बस वाहतूक बंद असल्याने ३१ मार्चपर्यंतच सुमारे २ कोटी ५० लाखांचा फटका बसला आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊ न असल्याने ६ कोटींचे उत्पन्न बुडणार आहे. लॉकडाऊ न वाढला तर त्याहून मोठा आर्थिंक फटका बसणार आहे. लॉकडाऊ नदरम्यान बससेवा बंद असली तरी शासननिर्देशानुसार कर्मचाऱ्यांना वेतन वेतन द्यावे लागणार आहे. आपली बस सेवा खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून चालविली जाते. परंतु त्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावयाचे असल्याने ते महापालिकेकडे बिलाची मागणी करतील. बस बंद असल्यामुळे किलोमीटरनुसार भाडे द्यावे लागणार नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कंत्राटदाराकडून वेतनाच्या पैशाची मागणी केली जाईल.

दर महिन्याला ६ कोटींचा तोटा
परिवहन विभागावर दर महिन्याला ११ ते १२ कोटींचा खर्च येतो. तिकीट व बसवरील जाहिरातीच्या माध्यमातून महिन्याला ५ ते ६ कोटींचे उत्पन्न होते. म्हणजेच उत्पन्न वजा जाता महिन्याला ६ कोटींचा तोटा होत आहे. लॉकडाऊ नमुळे जवळपास एक महिन्याचे उत्पन्न बुडणार आहे.

कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागेल
लॉकडाऊ नमुळे २२ मार्चपासून आपली बस सेवा बंद आहे. बस बंद असल्यातरी शासननिर्देशानुसार बस कर्मचाऱ्यांना या कालावधीत वेतन द्यावे लागणार आहे. ही जबाबदारी कंत्राटदाराची असली तरी त्यांच्याकडून मनपाकडे वेतनाच्या रकमेची मागणी होण्याची शक्यता आहे.
बाल्या बोरकर, परिवहन सभापती, मनपा

Web Title: CoronaVirus in Nagpur: Municipal Transport Department hit by Millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.