शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

CoronaVirus in Nagpur : भयावह ! नागपुरात ४६ मृत्यूची नोंद : ९८९ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 23:12 IST

ऑगस्ट महिन्यात रुग्ण व मृत्यूसंख्येचे जुने विक्रम मोडीत निघत आहेत. बुधवारी रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना गुरुवारी मृत्यूसंख्येची सर्वाधिक नोंद झाली. एकाच दिवशी ४६ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची एकूण संख्या ६२५ वर पोहचली. ९८९ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १७,७२२ झाली.

ठळक मुद्दे ११७ ग्रामीण भागातील तर ८७२ शहरातील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑगस्ट महिन्यात रुग्ण व मृत्यूसंख्येचे जुने विक्रम मोडीत निघत आहेत. बुधवारी रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना गुरुवारी मृत्यूसंख्येची सर्वाधिक नोंद झाली. एकाच दिवशी ४६ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची एकूण संख्या ६२५ वर पोहचली. ९८९ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १७,७२२ झाली. यात ग्रामीणमधील ४,३३०, शहरातील १३,३९२ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद ७ ऑगस्ट रोजी झाली होती. ४० रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर आठवडाभरातच मृतांची संख्या त्याच्यावर गेली. परिणामी, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मेयोमध्ये आज १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात सर्वात कमी वयाचा ३७ वर्षीय पुरुष आहे. उर्वरितांमध्ये ५२ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, ६३ वर्षीय पुरुष, ६४ वर्षीय महिला, ६५ वर्षीय दोन महिला, ७१ वर्षीय महिला व पुरुष, ७५ वर्षीय महिला, ८४ वर्षीय पुरुष व ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मेडिकलमध्ये ४० वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय महिला, ६७ वर्षीय पुरुष व ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. उर्वरित मृतांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून उपलब्ध झालेली नाही. आज मृतांमध्ये ग्रामीण भागातील चार, शहरातील ३८ तर जिल्ह्याबाहेरील चार होते.अ‍ॅन्टिजेन चाचणीत ३६० रुग्ण पॉझिटिव्हअ‍ॅन्टिजन चाचणीची संख्या वाढताच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली. आज ३६० रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोने केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत १९०, मेडिकलमध्ये २१, एम्समध्ये १३६, नीरीमध्ये एक, माफसूमध्ये ३८, खासगी लॅबमध्ये २४३ असे एकूण ९८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ११७ ग्रामीण भागातील तर ८७२ शहरातील रुग्ण आहेत. कोरोनाबाधित असलेले २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७,६३६ वर पोहचली. सध्या ८,४३३ रुग्ण उपचार घेत आहेत.दैनिक संशयित : ४,९००बाधित रुग्ण : १७,७२२बरे झालेले : ७,६३६उपचार घेत असलेले रुग्ण : ८,४३३मृत्यू : ६२५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू