शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

CoronaVirus in Nagpur : नऊ महिन्याच्या गर्भवतीसह चार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 01:15 IST

नऊ महिन्याच्या गर्भवतीला कोरोना विषाणूची लागण झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपुरातील हे पहिलेच प्रकरण आहे. या महिलेसह आणखी चौघे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देनागपुरात रुग्णाची संख्या ६३ : सतरंजीपुऱ्यातील तीन तर एक मोमिनपुरा संपर्कातील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नऊ महिन्याच्या गर्भवतीला कोरोना विषाणूची लागण झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपुरातील हे पहिलेच प्रकरण आहे. या महिलेसह आणखी चौघे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे. गर्भवतीसह तिघे सतरंजीपुऱ्यातील तर एक मोमिनपुऱ्यातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. नागपुरात या आठवड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. १२ ते १८ एप्रिल या सात दिवसात ३६ संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आतापर्यंत निदान झालेल्या रुग्णांमध्ये २० ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, नागपुरात कोरोनाचा पहिल्या बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मृताच्या व त्यांच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेले साधारण २५ वर रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी नोंद झालेल्या चार रुग्णांपैकी तीन रुग्ण याच मृताच्या वसाहतीतील आहेत. नऊ महिन्याची गर्भवती महिला आणि तिचा २९ वर्षीय पती मृताच्या घराच्या शेजारी राहतात. या दोन घरामधील दरवाजामधील अंतर पाच फुटापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येते. या जोडप्याला दोन वर्षाची मुलगी आहे. यांच्यासह सात जणांना १६ एप्रिल रोजी आमदार निवासातील अलगीकरण कक्षात दाखल केले होते. याच दिवशी यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले असता पती, पत्नीचा नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोघांना मेडिकलमध्ये दाखल केले आहे. गर्भवती महिलेची विशेष काळजी घेतली जात असून, तिला मे महिन्याची प्रसूतीची तारीख दिली आहे. उर्वरित दोनमधील एक सतरंजीपुºयातीलच ३० वर्षीय पुरुष आहे. तो कोरोनाबाधित मृताच्या संपर्कातील आहे, तर दुसरा ४२ वर्षीय रुग्ण हा मोमिनपुºयातील रहिवासी आहे. ४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आलेला मोमिनपुºयातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. या दोघांना मेयोमध्ये दाखल केले आहे. नागपुरात आतापर्यंत १२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.१७९ नमुने निगेटिव्हअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यातील ६० नमुने तपासले. यात अमरावतीमधील एक नमुना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५९ नमुने निगेटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत ६५ नमुने तपासण्यात आले. यात आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षातील ५० नमुन्यांचा समावेश होता. यातील चार पॉझिटिव्ह नमुने वगळता ६१ नमुने निगेटिव्ह आले. मेडिकलने ६० नमुने तपासले, यातील एक नमुना पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आला. उर्वरित ५९ नमुने निगेटिव्ह आले. आज दिवसभरात एकूण १८५ नमुने तपासण्यात आले, यातील १७९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ८६दैनिक तपासणी नमुने १८५दैनिक निगेटिव्ह नमुने १७९नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६३नागपुरातील मृत्यू १डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १२डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १०७५क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ५८२

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याpregnant womanगर्भवती महिला