शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus in Nagpur : महामारीचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 20:53 IST

Epidemic slowed down कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आल्याने महामारीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांत २२२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यानंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,५८,६०४ झाली आहे. गुरुवारी ७७ रुग्णांचे जीव गेले. मृत्यूची संख्या ८४०२ झाली आहे.

ठळक मुद्दे २२२४ नव्या बाधितांची नोंद, ७७ मृत्यू : रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आल्याने महामारीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांत २२२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यानंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,५८,६०४ झाली आहे. गुरुवारी ७७ रुग्णांचे जीव गेले. मृत्यूची संख्या ८४०२ झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १३ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठत २३४३ चा आकडा ओलांडला असताना हाहाकार उडाला होता. परंतु यावर्षी २४ एप्रिल रोजी ७९९९वर गेलेली रुग्णसंख्या आज दोन हजारावर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

नागपूर जिल्ह्यात सलग १४ दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होतआहे. मात्र, त्या सोबतच चाचण्यांच्या संख्येतही मोठी घट होऊ लागली आहे. हे धोक्याचे संकेत तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. १३ एप्रिल रोजी आतापर्यंतचा सर्वाधिक, २९,१२२ चाचण्या झाल्या होत्या. त्यानंतर २४ ते २५ हजार दरम्यान चाचण्या होत होत्या. परंतु २ मेपासून ही संख्या १५ ते २० हजाराच्या घरात आली आहे. गुरुवारी १५,७१४ चाचण्या झाल्या. यात १२,६५५ आरटीपीसीआर तर ३०५९ रॅपीड अँटिजेन चाचण्या होत्या. आज ५,८८४ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढला असून तो ८८ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत ४,१०,५८६ रुग्ण बरे झाले आहेत.

मृत्यूची संख्या कधी कमी होणार?

रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत असताना मृत्यूचे प्रमाण अद्यापही चिंता व्यक्त करणारे आहे. कोरोनाचा या १४ महिन्यांच्या काळात सर्वाधिक मृत्यूची नोंद २२ एप्रिल २०२१ रोजी झाली. ११० रुग्णांचे जीव गेले. त्यानंतर दैनंदिनी ८० ते ९० रुग्णांचे मृत्यू होत होते. मागील सात दिवसांत ही संख्या ७० ते ८० वर आली असलीतरी मृत्यूचे प्रमाण कधी कमी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहर आणि ग्रामीणमध्ये केवळ ११३ रुग्णांचा फरक

शहरात आज ११६३ रुग्ण व ४१ मृत्यूची नोंद झाली. तर ग्रामीण भागात १०५० रुग्ण व २५ मृत्यूची नोंद झाली. शहर आणि ग्रामीणमध्ये केवळ ११३ रुग्णांचा फरक असल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,२३,१२५ व मृतांची संख्या ५०६० झाली आहे. ग्रामीणमध्ये १,३४,०८४ रुग्ण व २१२९ मृत्यूची नोंद झाली आहे.

 कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १५,७१४

ए. बाधित रुग्ण :४,५८,६०४

सक्रीय रुग्ण : ३९,६१६

बरे झालेले रुग्ण :४,१०,५८६

ए. मृत्यू : ८४०२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर