CoronaVirus in Nagpur : ३२ दिवसांनी रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 09:09 PM2021-05-08T21:09:33+5:302021-05-08T21:14:31+5:30

Coronavirus, Nagpur news कोरोनाचा वेग मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र नागपूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मागील महिन्यात ७,९९९वर पोहचलेली दैनंदिन रुग्णसंख्या शनिवारी ३,८२७ नोंदविण्यात आली. ३२ दिवसानंतर पहिल्यांदाच एवढे कमी रुग्ण आढळून आले. मात्र, मृत्यूची संख्या अद्यापही कायम आहे. पुन्हा ८१ रुग्णांचे मृत्यू झाले. विशेष म्हणजे, दिवसभरात ७,७९९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढून ८५.१३ टक्क्यांवर पोहचला आहे.

Coronavirus in Nagpur: Decrease in number of patients after 32 days | CoronaVirus in Nagpur : ३२ दिवसांनी रुग्णसंख्येत घट

CoronaVirus in Nagpur : ३२ दिवसांनी रुग्णसंख्येत घट

Next
ठळक मुद्दे३८२७ नवे रुग्ण तर ८१ मृत्यूची नोंद : पहिल्यांदाच सर्वाधिक ७,७९९ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वेग मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र नागपूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मागील महिन्यात ७,९९९वर पोहचलेली दैनंदिन रुग्णसंख्या शनिवारी ३,८२७ नोंदविण्यात आली. ३२ दिवसानंतर पहिल्यांदाच एवढे कमी रुग्ण आढळून आले. मात्र, मृत्यूची संख्या अद्यापही कायम आहे. पुन्हा ८१ रुग्णांचे मृत्यू झाले. विशेष म्हणजे, दिवसभरात ७,७९९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढून ८५.१३ टक्क्यांवर पोहचला आहे.

नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येचे जुने विक्रम मोडित निघाले. २४ एप्रिल रोजी ७,९९९ रुग्णांची नोंद होऊन रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला. त्यानंतर सहा ते सात हजार दरम्यान रुग्णसंख्या स्थिरावली. ३ मेपासून दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजाराखाली आली. सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोद ६ एप्रिल रोजी झाली होती. ३,७५८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत घसरण झाल्याचे दिसून आले. शनिवारी २०,२३५ चाचण्या झाल्या. यात १७,१०७ आरटीपीसीआर तर ३,१२८ रॅपीड अँटिजेन चाचण्यांचा ासमावेश होता. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर १८.१९ टक्के होता.

शहरात २०१६ तर, ग्रामीणमध्ये १७९७ रुग्ण

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २०१६ तर ग्रामीणमधील १७९७ रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये शहरातील ५१ तर ग्रामीणमधील १६ मृत्यू होते. शहरात आज १४,७५६ तर ग्रामीणमध्ये ५४७९ चाचण्या झाल्या. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील पॉझिटिव्हिटीचा दर मोठा असल्याने या भागात चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

आठवड्याभरात ३१,६०८ रुग्ण तर, ५८२ मृत्यू

मागील दोन आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्ण व मृत्यूसंख्येत मोठी घट आल्याचे दिसून येत आहे. १८ ते २४ एप्रिल दरम्यान रुग्णांची संख्या ५८,१८९ तर मृतांची संख्या ७४८ होती. २५ एप्रिल ते १ मे या आठवड्यात ४७,९४६ रुग्ण व ६५१ मृत्यू नोंदविण्यात आले होते. २ ते ८ मे या आठवड्यात ३१,६०८ रुग्ण व ५८२ मृत्यूची नोंद झाली आहे.

आठवड्याची स्थिती

१८ ते २४एप्रिल : ५८,१८९ रुग्ण : ७४८ मृत्यू

२५ एप्रिल ते १ मे : ४७,९४६ रुग्ण : ६५१ मृत्यू

२ ते ८ मे : ३१,६०८ रुग्ण : ५८२ मृत्यू

कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: २०,२३५

ए. बाधित रुग्ण :४,४५,९७१

सक्रीय रुग्ण : ५८,२४५

बरे झालेले रुग्ण :३,७९,६५७

ए. मृत्यू : ८,०६९

Web Title: Coronavirus in Nagpur: Decrease in number of patients after 32 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.