शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

CoronaVirus in Nagpur : नागपुरात सध्यातरी कोरोनासाठी ३७० खाटा, ८ व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:25 IST

कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या नागपुरात १६ झाली आहे. या रुग्णांसाठी सध्यातरी मेडिकलमध्ये ९० खाटा, ४ व्हेंटिलेटर, मेयोमध्ये ८० खाटा, ४ व्हेंटिलेटर, डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १० खाटा तर रेल्वे हॉस्पिटलकडे १९० अशा एकूण ३७० खाटा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमध्ये १२००, लता मंगेशकरमध्ये ३६३ खाटा प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या नागपुरात १६ झाली आहे. या रुग्णांसाठी सध्यातरी मेडिकलमध्ये ९० खाटा, ४ व्हेंटिलेटर, मेयोमध्ये ८० खाटा, ४ व्हेंटिलेटर, डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १० खाटा तर रेल्वे हॉस्पिटलकडे १९० अशा एकूण ३७० खाटा उपलब्ध आहेत. परंतु लवकरच मेयो, मेडिकलमध्ये १२०० तर लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ३६३ खाटांची सोय केली जाणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा या तिसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या वाढतानाही दिसून येत आहे. एकूण कोरोना रुग्णाच्या संख्येत देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या शहरात नागपूर पाचमध्ये आहे. यामुळे नियोजनाच्या दृष्टीने वेगाने पावले उचलली जात आहे. शासनाने कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी मेयो, मेडिकलला ३५ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. यातील २५ कोटी उपलब्धही करून दिले आहेत. या निधीतून मेडिकलमध्ये २०० खाटांचे अतिदक्षात विभाग (आयसीयू) व ४०० खाटांचे ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) होणार आहे. मेयोमध्ये १६० खाटांचे आयसीयू व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ होणार आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलने तूर्तास १० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. परंतु लवकरच ३५० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड, १३ खाटांचे ‘एचडीयू’ तर १० खाटांचे ‘आयसीयू’ असणार आहे. या शिवाय रेल्वेच्या अजनी हॉस्पिटलमध्ये ४० व आरपीएफ बॅरेकमध्ये १५० असे एकूण १९० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार करून ठेवण्यात आला आहे. एकूणच नागपुरात कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी १७६३ खाटा असणार आहे. परंतु या क्षणी नागपुरात केवळ मेयो, मेडिकल, लता मंगेशकर व रेल्वेचे हॉस्पिटल मिळून ३७० खाटा व ८ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. महानगरपालिकेने व खासगी हॉस्पिटलने अद्यापही आपल्या रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपारासाठी तयारी दाखविली नाही, हे विशेष. मेयो, मेडिकलमध्ये सध्याची स्थितीमेयोमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २० खाटांच्या स्वतंत्र वॉर्डासह संशयित रुग्णांसाठी २०-२० खाटांचे तीन वॉर्ड मिळून ८० खाटा आहेत. सध्या येथे ३० संशयित तर नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये बाधित रुग्णांसाठी ४० खाटांच्या वॉर्डसह संशयित रुग्णांसाठी ३० व २० खाटांचे दोन वॉर्ड मिळून एकूण ९० खाटा आहेत. सध्या २५ संशयित व ३ पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत. दोन्ही रुग्णालयात रुग्णांसाठी सध्याच्या स्थितीत चार-चार व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल