शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

CoronaVirus in Nagpur : सुटीनंतर उपद्रव करणाऱ्या नागपुरातील त्या कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 20:05 IST

मेडिकलमध्ये उपचार घेऊन सुटी झाल्यानंतर घरी पोहोचलेल्या एका कोरोनाबाधिताने सामाजिक वातावरण दूषित करू पाहणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्त मुंढे यांच्या दणक्यानंतर कारवाई : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टही केली

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेऊन सुटी झाल्यानंतर घरी पोहोचलेल्या एका कोरोनाबाधिताने सामाजिक वातावरण दूषित करू पाहणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिरुल मोहम्मद (वय ३४) असे या उपद्रवी व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दणक्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.तो व्यापारी असून तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. टोपी विकण्याचा व्यवसाय करणारा जमिरुल १३ मार्चला दिल्लीला गेला होता. तेथून माल खरेदी करून तो १५ मार्चला नागपुरात आला. त्याची दिल्ली ट्रॅव्हल हिस्ट्री कळाल्यानंतर त्याला एमएलए होस्टेल नागपूर येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. ४ तारखेला तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दरम्यान, त्याच्या सोबतच त्याच्या कुटुंबातील ७ आणि आजूबाजूला राहणाऱ्या, संपर्कात आलेल्या ३९ व्यक्तींनाही क्वारंटाईन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी लाल साहेब चौक, कादर चौक, टिमकी, मोमिनपुरा आणि भगवाघर चौक हा परिसर सील केला.दरम्यान, उपचार करून त्याला शुक्रवारी रात्री सुटी देण्यात आली. जमीरउल रात्री घरी पोहोचला आणि काही वेळातच त्यांनी उपद्रव सुरू केला. स्वत:चे डिस्चार्ज रिपोर्ट त्याने सोशल मीडियावर अपलोड केले. आपल्याला काहीच झाले नव्हते. जबरदस्तीने आपल्याला क्वारंटाईन करण्यात आल्याचा कांगावा त्याने सुरू केला.शनिवारी सकाळी हा प्रकार कळाल्यानंतर त्याच्या उपद्रवाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी तहसील पोलिसांकडे धाव घेत जमीरउल विरुद्ध तक्रार दिली. त्यावरून तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर यांनी जमीरउल विरुद्ध भादवीच्या कलम १८८,१८६, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम ३ नुसार शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि पोलिसांचे पथक पुन्हा जमिरुलच्या घरी धडकले. वृत्त लिहिस्तोवर जमीरउलला ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू होती.यापूर्वीही केला उपद्रवआरोपी जमीरुल याने त्याला क्वारंटाईन करून एमएलए होस्टेलच्या अलगीकरण कक्षात ठेवले असता तो तिथेही उपद्रव करीत होता. त्याने मोबाईलवरून अनेकांचे फोटो काढले. शिवाय इकडे तिकडे तो फिरत होता. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून तेथील व्यवस्था चांगली नसल्याच्या तक्रारी करूनही त्याने प्रशासनाला नाहक त्रास देण्याचा उपद्रव केला होता, अशी माहिती पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पोलिसांचे प्रशासनाला पत्रकोरोनाबाधित असल्याने जमीरुल मुळे आधीच परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. उपचारानंतर सुटी झाल्यावर त्याने स्वत:ची, कुटुंबातील सदस्यांची आणि इतरांची पुरेशी काळजी न घेता सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गंभीर असून त्याची एकूणच वृत्ती बघता त्याला पुन्हा क्वारंटाईन करण्यात यावे, अशी सूचनावजा मागणी पोलिसांनी प्रशासनाकडे शनिवारी एका पत्रातून केली आहे

 

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या