शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३ मृत्यू : २९४ नव्या रुग्णांची नोंद , ग्रामीणमध्ये मृत्यूसत्र थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 11:08 PM

Corona Virus 3 deaths in Nagpur: 294 new cases registered , Nagpur news कोरोनाचे वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण होते. विशेषत: मृत्यूच्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाचे नियोजन व नागरिकांच्या सजगतेमुळे सलग तीन महिन्यानंतर शुक्रवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

ठळक मुद्देतीन महिन्यानंतर मोठा दिलासा 

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण होते. विशेषत: मृत्यूच्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाचे नियोजन व नागरिकांच्या सजगतेमुळे सलग तीन महिन्यानंतर शुक्रवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच शहरात ३ तर जिल्ह्याबाहेरील ४ अशा एकूण ७ मृत्यूची नोंद झाली. आज २९४ नव्या बाधितांची भर पडली. रुग्णसंख्या ९५,१९३ तर मृतांची संख्या ३,११७ झाली.

शहरात कोरोनाचा पहिला बळी ४ एप्रिल तर ग्रामीणमधील हिंगणा तालुक्यात ३० मे रोजी गेला. जुलै महिन्यात किरकोळ नोंद असताना ऑगस्ट महिन्यापासून शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूसत्राला सुरुवात झाली. सलग तीन महिने हे सत्र होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्ण व मृत्यूची संख्या कमी होऊ लागली होती. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामीणमधील मृत्यूसत्र थांबल्याने व शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. ग्रामीणमध्ये आतापर्यंत ५६५, शहरात २,१४० तर जिल्ह्याबाहेरील ४१२ रुग्णांचे मृत्यू झाले. आज ३८१ बाधित बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ८७,६४० झाली आहे. याचे प्रमाण ९२.०७ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या शहरात ४,४३६ रुग्ण क्रियाशील आहेत.

रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या झाली कमी

जिल्ह्यात आज ५,०३९ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. इतर दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. यात रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या १,४८४ आहे. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ३,५५५ आहे. ॲन्टिजेन चाचण्यांमधून ३२ रुग्ण पॉझिटिव्ह तर १,४५२ रुग्ण निगेटिव्ह आले.

आमदार निवासातील कोविड केअर सेंटर बंद!

आमदार निवासाला सुरुवातीला क्वारंटाईन नंतर कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आले. सर्वाधिक रुग्ण याच सेंटरमध्ये होते. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात होताच आमदार निवासात नवे रुग्ण ठेवणे बंद झाले. गुरुवारी येथील २८ रुग्णांना सुटी देण्यात आल्याने शुकशुकाट होता. यामुळे हे सेंटर आता बंद करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उर्वरित पाचपावलीमध्ये ३६ तर व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमध्ये आठ रुग्ण आहेत.

ग्रामीणमधील मृत्यूची स्थिती

महिना  मृत्यू

मे ०१

जून ०२

जुलै २६

ऑगस्ट १४९

सप्टेंबर २९७

ऑक्टोबर ९०

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित : ५,०३९

बाधित रुग्ण : ९५,१९३

बरे झालेले : ८७,६४०

 उपचार घेत असलेले रुग्ण : ४,४३६

मृत्यू : ३,११७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर