CoronaVirus in Nagpur : २८८५ पॉझिटिव्ह, ५८ मृत्यू, १६,०८६ नमुन्यांची तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:42 PM2021-03-31T22:42:57+5:302021-03-31T22:44:25+5:30

Coronavirus, Nagpur news मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात २,८८५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ५८ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे चाचण्या वाढून १६,०८६ इतक्या झाल्या.

Coronavirus in Nagpur: 2885 positive, 58 deaths, 16,086 samples tested | CoronaVirus in Nagpur : २८८५ पॉझिटिव्ह, ५८ मृत्यू, १६,०८६ नमुन्यांची तपासणी 

CoronaVirus in Nagpur : २८८५ पॉझिटिव्ह, ५८ मृत्यू, १६,०८६ नमुन्यांची तपासणी 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात २,८८५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ५८ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे चाचण्या वाढून १६,०८६ इतक्या झाल्या. मंगळवारी केवळ ४६,६०४ नमुन्यांचीच तपासणी करण्यात आली होती. मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. आतापर्यंत एकूण २,२६,०३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर मृत्यूची संख्याही ५०९८ वर पोहोचली आहे.

बुधवारी आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरतील १८८४, ग्रामीणमधील ९९७ आणि जिल्ह्याबाहेरचे ४ जण आहेत. तर मृतांमध्ये शहरातील ३३, ग्रामीणमधील २१ आणि जिल्ह्याबाहेरचे ४ जण आहेत. बुधवारी १७०५ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण १,८१,६०९ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झालेले आहेत. रिकव्हरी रेट ८०.३४ वर पोहोचला आहे. बुधवारी शहरातील १०,४९५ व ग्रामीणमधील ५५९१ नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत १६ लाख २४ हजार २७७ नमुने तपासण्यात आलेले आहेत. बुधवारी खासगी प्रयोगशाळेत ११५० ॲन्टिजेन टेस्टपैकी १८३, एम्सच्या प्रयोगशाळेत ५३४, मेडिककलमध्ये ६२६, मेयो १३१, नीरी ११६, आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १४५ नमुने पॉझिटिव्ह आलेत.

ॲक्टिव्ह रुग्ण - ३९,३३१

बरे झालेले - १,८१,६०९

मृत - ५०९८

Web Title: Coronavirus in Nagpur: 2885 positive, 58 deaths, 16,086 samples tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.