शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ४४ व्या दिवशी १०० वा रुग्ण : उपाययोजनांचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:20 IST

अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला बजाजनगर येथील पहिला रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. तब्बल ४४ दिवसानंतर १०० व्या रुग्णाची आज शुक्रवारी नोंद झाली. विशेष म्हणजे, मुंबईत शंभरी गाठायला २१, नाशिकमध्ये २२ तर पुण्यात २४ दिवस लागले.

ठळक मुद्देमुंबईत २१ व्या दिवशी, नाशिकमध्ये २२ व्या दिवशी तर पुण्यात २४ व्या दिवशी गाठली शंभरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला बजाजनगर येथील पहिला रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. तब्बल ४४ दिवसानंतर १०० व्या रुग्णाची आज शुक्रवारी नोंद झाली. विशेष म्हणजे, मुंबईत शंभरी गाठायला २१, नाशिकमध्ये २२ तर पुण्यात २४ दिवस लागले. त्या तुलनेत नागपुरात दुप्पट दिवस लागले. नागपुरात नोंद झालेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाकडून त्याची पत्नी, त्याच्यासोबत अमेरिकेला प्रवासाला असलेले त्याचे दोन सहकारी पॉझिटिव्ह आले. परंतु त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे पहिली साखळी येथेच खंडित झाली. त्यानंतर २६ मार्च रोजी दुसरा बाधित रुग्ण आढळून आला. या रुग्णाची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी होती. या रुग्णाकडून त्याची आई, पत्नी, मुलगा, त्याच्या दुकानातील व्यवस्थापक, व्यवस्थापकाची मुलगी, दुकानातील कर्मचारी, बाधित रुग्णाचा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगा असे एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने तपासण्यात आले असता सर्व निगेटिव्ह आले. ३० मार्च रोजी दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेला आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. याच्या संपर्कात आलेले ३४ नमुने तपासण्यात आले असता सर्व नमुने निगेटिव्ह आले. यामुळे लागण झालेल्याची साखळी खंडित झाली होती. परंतु ४ एप्रिल रोजी कोरोना संशयित ६८ वर्षीय मृताचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णापासून व त्यांच्या नातेवाईकापासून तर मोमीनपुऱ्यातील एका बाधित रुग्णांपासून एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या ८८ वर पोहचली. यातील ८६ रुग्णांना आधीपासूनच क्वारंटाईन करून ठेवण्यात आल्याने संसर्गाचे प्रमाण कमी राहिले. परिणामी, शंभरी गाठण्यातही नागपूरला ४४ दिवस लागले हे शासनाचे यश आहे. मुंबईत पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. २१ दिवसाने म्हणजे ३१ मार्चला १०० व्या रुग्णाची नोंद झाली. पुण्यात पहिल्या रुग्णाची नोंद ९ मार्च रोजी झाली. २४ दिवसाने म्हणजे १ एप्रिल रोजी १०० वा रुग्ण दिसून आला. नाशिकमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद २९ मार्च रोजी झाली.२२ दिवसाने म्हणजे १९ एप्रिल रोजी १०० व्या रुग्णाची नोंद झाली. विशेष म्हणजे, मुंबई व नागपुरात एकाच दिवशी रुग्णाची नोंद झाली असली तरी मुंबईला शंभरी गाठायला २१ तर नागपूरला ४४ दिवस लागले. लोकांनी शासनाला व आरोग्य यंत्रणेला आणखी सहकार्य केल्यास नागपुरातील स्थिती सामान्य होऊ शकेल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञानी व्यक्त केला आहे.राज्यातील कोरोनाची शंभरीशहर            पहिला रुग्ण          शंभरी रुग्णमुंबई            ११ मार्च                ३१ मार्चपुणे              ९ मार्च                  १ एप्रिलनाशिक        २९ मार्च               १९ एप्रिलनागपूर         ११ मार्च                २४ एप्रिल

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर