शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा! सरसंघचालकांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 17:58 IST

कोरोनाविरोधातील ही लढाई आपल्याला घरात बसूनच जिंकावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा

ठळक मुद्दे संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. तसेच कोरोनाविरोधात घरात राहुनच जिंकता येईलसध्याच्या घडीला घरीच राहा आणि ईश्वराची प्रार्थना करालॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा

नागपूर - देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवक आणि नागरिकांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आवाहन केले आहे. कोरोनाविरोधातील ही लढाई आपल्याला घरात बसूनच जिंकावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

सध्याच्या घडीला कार्यक्रम करणे हे आपले काम नाही. तर आपले काम हाच कार्यक्रम आहे. सेवा करण्याचे काम आज बदलले आहे. सध्याच्या घडीला घरीच राहा आणि ईश्वराची प्रार्थना करा. संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. तसेच कोरोनाविरोधात घरात राहुनच जिंकता येईल, असे त्यांनी सांगितले.

हा समाज आपला आहे. हा देश आपला आहे. त्यामुळे काहीजण काम करत आहेत. काही गोष्टी सर्वांसाठी स्पष्ट झालेल्या नाहीत. हा नवा आजार आहे. त्यामुळे याबाबत अधिकची माहिती कुणाकडे नाही. अशा परिस्थितीत आवश्यक ती परवानगी घेऊन, खबरदारी घेऊन काम करा. आपण थकता कामा नये, प्रयत्न करत राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.दरम्यान, देशातील कोरोनाच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात चिंताजनक पातळीपर्यंत  वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1990 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती 26 हजार 496 पर्यंत पोहोचली आहे. तर या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू आला आहे. तर याच काळात 741 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 5 हजार 804 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत