शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनपा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचारास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:07 IST

आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले. असे असताना, नागपुरात मनपा रुग्णालयात बाधितांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देनगरसेवकाची तक्रारइंदिरा गांधी रुग्णालयाच्या चालढकलपणामुळे रुग्णांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांना उपचार मिळावा म्हणून लाखो रुपये खर्च करून महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय अद्ययावत करण्यात आले. कोविड हेल्थ सेंटरचा दर्जाही देण्यात आला. आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले. असे असताना, बाधितांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णाच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे.

शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. परंतु कोविड रुग्णांसाठी मनपाचे दवाखाने खुले होण्यास तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागला. यावरून मनपाचा आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी किती गंभीर आहे, ते दिसून येते. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून कोविड रुग्णांची सेवा घडावी म्हणून रुग्णालयात आवश्यक बदलांसह आॅक्सिजन पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु सर्व सोयी असताना कुठले तरी कारण समोर करून रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्याचा सपाटा सुरू आहे. १२५ खाटा असलेल्या या रुग्णालयात सध्या १२ कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

या रुग्णालयासंदर्भात नगरसेवक संजय महाकाळकर यांनीही तक्रार केली आहे. बुधवारी कोरोनाबाधित रुग्णाला या रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासणी न करताच त्याला दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे मेयो, मेडिकलमधील खाटा कमी पडत असताना व खासगीमध्ये लाखो रुपये शुल्क आकारले जात असताना मनपा रुग्णालयाच्या चालढकलपणामुळे गरीब व सामान्य रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

-‘सीसीसी’मधीलही रुग्णांसही नकारकोविड रुग्णांवरील उपचारासाठी दिशादर्शक ठरवून दिले आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन किंवा कोविड के अर सेंटर (सीसीसी), सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड हेल्थ सेटर व मध्यम व गंभीर रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटल आहेत. ‘सीसीसी’मध्ये ज्या रुग्णांना ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यास कोविड हेल्थ सेंटरमध्ये पाठविले जाते. परंतु सीसीसीच्या काही डॉक्टरांचे म्हणणे आहे, येथे पाठविलेल्या बहुसंख्य रुग्णांवर उपचार न करताच मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जाते. यात लागणारा वेळ हा रुग्णाच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे.

-मनपाच्या हेल्थ सेंटरची ही जबाबदारीकोविड पॉझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन पातळी नियमित तपासणे उपचाराचा भाग आहे. ९४ किंवा त्यापेक्षा शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली जात असल्यास तातडीने ऑक्सिजन देण्याची गरज पडते. याची सोय मनपाच्या या इंदिरा गांधी रुग्णालयात करण्यात आली आहे. यासाठी ऑक्सिजनसह, औषधे व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु रुग्णालय आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. कांचन किंमतकर यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला असता व संदेशही दिला असतानाही त्यांनी बोलणे टाळले.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस