शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

कोरोनामुळे सुटीचा परिणाम : नागपुरात शाळांमध्ये शुकशुकाट, कोचिंंग क्लासेसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:45 IST

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व शाळा-महाविद्यालये, कोचिंंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

ठळक मुद्देगार्डन मात्र सुरू

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व शाळा-महाविद्यालये, कोचिंंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट होता. आरोग्य विभागातर्फे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले. तरीही उद्याने गर्दीने फुलली होती.

शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा आदेश शनिवारी जारी करण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सोमवारपासून सुटी असल्याचे कळविले होते. काही शाळांचा विद्यार्थ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत आले. शाळेला सुटी जाहीर करण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितल्यानंतर विद्यार्थी आल्यापावली परत गेले. हुडकेश्वर मार्गावरील एका शाळेत दहावीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होती. धनगवळी नगरातील एका प्ले ग्रुप ते केजी टू पर्यंत असलेल्या कॉन्व्हेंटने विद्यार्थ्यांना सुटी असल्याचे कळविले नव्हते. त्यामुळे या कॉन्व्हेंटमध्ये पालक आपल्या चिमुकल्यांना सोडण्यासाठी येताना दिसले. मानेवाडा रिंग रोडवरील एका शाळेत सुटीची कल्पना नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत आले, परंतु सुटी असल्याचे कळताच ते आपल्या घरी निघून गेले. नंदनवनमधील बहुतांश कोचिंग क्लासेस रविवारपासून बंद असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. तर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या एका कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणे सुरु होते. तेथील संचालकांना विचारणा केली असता त्यांनी शनिवारी उशिरा आदेश मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना कळविणे शक्य झाले नाही असे सांगितले. दुपारपासून आम्हीही क्लास बंद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भांडेप्लॉट चौक, नवीन सुभेदार ले आऊट परिसरातील कोचिंग क्लासेसही बंद असल्याचे चित्र दिसले.गार्डनमध्ये नागरिकांची गर्दीशहरातील बहुतांश गार्डन सुरू असल्याचे चित्र सोमवारी दिसले. सुभेदार ले आऊट परिसिरातील दत्तात्रयनगर येथील उद्यानात सकाळी नागरिक आले होते. परंतु नेहमीपेक्षा नागरिकांची संख्या खूप कमी होती. धंतोलीतील ट्राफिक पार्कमध्येही पालक आपल्या मुलांना घेऊन आल्याचे चित्र दिसले. शंकरनगरमधील उद्यानातही तरुण, ज्येष्ठ नागरिक आले होते. रामदासपेठच्या दगडी पार्कमध्येही नागरिक आले होते. काही मॉल बंदशहरातील मॉल, सिनेमा थिएटरसुद्धा बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या निर्देशाचे पालन थिएटर चालक करीत आहेत. काही मॉलही बंद ठेवण्यात आले आहे. पण काही मॉल चालकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे सोमवारी दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाSchoolशाळा