शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 09:09 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे.

ठळक मुद्देगावकरी जपत आहेत ‘सोशल डिस्टन्सिंग’शेतीच्या कामाचेही सुयोग्य नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. त्याउलट शहरात मुजोर घटकांकडून कायद्याला आणि सामाजिक जबाबदारीला हरताळ फासण्यात येत आहे.जगभरात दरदिवसाला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि मृतांची संख्याही दरदिवस दुपटीने वाढत असल्याचे दृश्य आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले असून, त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारांनी संकटपूर्व पाऊल उचलले आहे. त्याला सर्वस्तरातून उत्तम प्रतिसादही लाभत आहे. डॉक्टर, पोलीस, सैनिक, स्वच्छता दूत, पत्रकार मंडळी अशा संकटाच्या परिस्थितीतही संयमाने आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. पण काही रिकामटेकडे आणि धर्मांध लोकांना कोरोनाच्या संसर्गाची मुळीच धास्ती दिसत नसल्याने, शहरात पोलिसांना त्यांच्यामागे बरीच धावपळ करावी लागत आहे. मात्र, त्याउलट गावांत प्रचंड शांतता दिसून येत आहे. शहराच्या शेजारच्या भागातील गावांमध्ये फेरफटका मारला असता गावकरी कायद्याचे मन:पूर्वक पालन करत आहे. एप्रिल हा महिना पाऊसपूर्व कामांच्या लगबगीचा असतो. त्यामुळे, वखरणी, पराटी उपटणे आदी कामे या काळात मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेला लॉकडाऊन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे गावकरी मानत असल्याचे दिसून येते. सुराबर्डी, वडधामना, गोंडखैरी, काटोल मार्गावरील ब्राह्मणवाडा या भागात नागरिक आपली शेतीविषयक कामे वगळता दिवसभर सोशल डिस्टन्सिंग जपत आहेत. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ६ अशी दिवसाला मोजून चार तास शेतीची कामे केली जात असून, शेतमजूरांना लागलीच सोडले जात आहे. शिवाय, ही कामे करताना मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. बाकीचा वेळ घरी आराम करणे आणि टीव्हीवर कोरोनाबाबतच्या बातम्यांचा आढावा घेण्यावर वेळ जात असल्याचे चित्र आहे.जनावरांना मोकळे सोडता येत नाही! - गिरीधर शेडामे: आम्ही सगळे गावकरी लॉकडाऊन पाळत आहोत. घराच्या बाहेर कुणी निघतही नाही. दिवसभर टीव्ही आणि कोरोनाच्या बातम्या यातच वेळ घालवतो आहोत. सकाळी व संध्याकाळी मात्र शेतीची कामे करावी लागतात. पिकांची कापणी आणि विक्री झाल्यावर पावसाळ्यापूर्वीची सगळी कामे उरकली जात आहेत. जनावरांकडे लक्ष पुरवावे लागते. त्यांचा चारा, पाणी करून परतावे लागत आहेत. वेळेअभावी अनेक कामेही रखडली आहेत. पण, सुरक्षा महत्त्वाची असल्याची भावना खडगाव, सावली येथील शेतकरी गिरीशर शेडामे यांनी व्यक्त केली.आम्ही गावकरी खंबीर! - लीलाधर डेहनकर: आम्ही गावकरी अगदी खंबीर आहोत. एका गावचा माणूस दुसºया गावी जात नाही किंवा येऊही दिल्या जात नाही. दुकाने, गाव पूर्णपणे बंद आहे. सध्या शेतात वखरणी व पराटी काढणे सुरू आहे. जूनच्या आधी हे काढणे गरजेचे आहे म्हणून शेतात सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास मजुरांसोबत काम करावे लागत आहे. काम करतानाही डिस्टन्सिंग पाळले जात असल्याचे माहुरझरी जवळील ब्राह्मणवाडा येथील शेतकरी लीलाधर डेहनकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस