शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात कोरोनाचा कहर, जिल्हा अद्यापही सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:08 IST

नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या चारशेच्या घरात पोहचत आहे. पण ग्रामीण भाग अजूनही कोरोनापासून सुरक्षितच आहे. कामठी आणि कन्हान भागात एक रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात अचूक नियोजन केले आणि गावकऱ्यांनी पाळलेल्या कडक लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरू शकला नाही.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे अचूक नियोजन : गावकऱ्यांनी पाळले कडक लॉकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या चारशेच्या घरात पोहचत आहे. पण ग्रामीण भाग अजूनही कोरोनापासून सुरक्षितच आहे. कामठी आणि कन्हान भागात एक रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात अचूक नियोजन केले आणि गावकऱ्यांनी पाळलेल्या कडक लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरू शकला नाही.कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह नागपूर शहरात मार्चच्या पहिल्या आठवड्यात सापडला. गेल्या अडीच महिन्यात एक एक करता शहरात कोरोना रुग्णांची संख्या ४०० च्या घरात पोहचली. त्यामुळे अनेक वस्त्या सील करण्यात आल्या. हजारोंच्या संख्येने लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. शहर पोलीस, महापालिका प्रशासनाने कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जनतेला वारंवार आवाहन केले. मात्र शहरातील परिस्थिती काही सुधारली नाही. पण ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने जनतेनेच लॉकडाऊन पाळला. एक जरी व्यक्ती बाहेरचा गावात आला, तर वाऱ्यासारखी माहिती प्रशासनापर्यंत पोहचते. गावकऱ्यांनी गावाचे रस्ते बंद केले. गावातील बाजार भरले नाही. बाहेरचा कुणी गावात येणार नाही आणि गावचा कुणी बाहेर जाणार नाही, याची काळजी ग्रामस्थांनी घेतली.एवढेच नाही, तर कोरोनाचे शहरात पदार्पण झाल्याच्या काळातच जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्यासाठी २० लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवून घेतले. खंडविकास अधिकारी, तालुका अधिकारी, आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या बैठका घेऊन गाव सॅनिटाईझ करण्यात आले. प्रत्येक गावामध्ये आठवड्यातून तीन वेळा निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.१४ चेकपोस्टवरून तपासणीबाहेरच्या जिल्ह्यातून अथवा राज्यातून आलेल्या व्यक्तीची ग्रामीण सीमेवर तपासणी करण्यासाठी १४ चेकपोस्ट तयार करण्यात आले. चेकपोस्टवर वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आले. पंचायत समिती स्तरावर कोरोना संबंधित समुपदेशन केंद्र तयार करण्यात आले.१३२ डॉक्टरांची नियुक्ती व १४ कोविड सेंटरची निर्मितीजिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्हाभरातील उपकेंद्रावर १३२ डॉक्टरांची नियुक्ती तसेच १४ कोविड सेंटरची निर्मिती केली. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शिक्षक यांच्या समन्वयातून आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या काळजीमुळे ग्रामीण भाग अद्यापही कोरोनापासून दूर राहिला.मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष व आरोग्य समिती सभापती, जि.प.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर