कोरोना योद्धेच दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 12:41 AM2021-05-13T00:41:32+5:302021-05-13T00:43:14+5:30

Corona Warrior awaits second dose केंद्र आणि राज्य सरकारने आखलेल्या पहिल्या तीन टप्प्यात मोठ्या उत्साहाने लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळविताना भटकंती करावी लागत आहे. नागपूर शहरात ३ लाख ३१ हजार नागरिक लसीकरणाचा दुसरा डोस कधी आणि कुठे मिळेल, या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. त्यात आता ऑनलाईन नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे. शहरात ४ लाख ५७ हजार ६८४ नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने यातील जेमतेम १ लाख २६ हजार ४६७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मागील काही दिवसापासून लस तुटवडा असल्याने नाममात्र लसीकरण सुरू आहे.

Corona Warrior awaits second dose | कोरोना योद्धेच दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

कोरोना योद्धेच दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देपहिल्याला दोन महिने झाल्याने अस्वस्थता वाढली : मागणीनुसार पुरवठा नसल्याने मनपा हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आखलेल्या पहिल्या तीन टप्प्यात मोठ्या उत्साहाने लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळविताना भटकंती करावी लागत आहे. नागपूर शहरात ३ लाख ३१ हजार नागरिक लसीकरणाचा दुसरा डोस कधी आणि कुठे मिळेल, या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. त्यात आता ऑनलाईन नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे. शहरात ४ लाख ५७ हजार ६८४ नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने यातील जेमतेम १ लाख २६ हजार ४६७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मागील काही दिवसापासून लस तुटवडा असल्याने नाममात्र लसीकरण सुरू आहे.

नागपूर शहरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा ५ लाख ८४ हजार ५५१ नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. शहरातील लसीकरण केंद्रांवर यापूर्वी रांगा लावून नागरिक लस घेत होते. मे महिन्यापासून केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी ऑनलाईन पूर्वनोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यातही लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या मागील काही दिवसापासून अनेक केंद्रे बंद असल्याचे चित्र आहे.

काही प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध असताना त्यात दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याऐवजी १८ ते ४४ वयोगटाच्या पहिल्या डोससाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार वापरले जात होते. बुधवारी या वयोगटातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. दुसरा डोस मिळत नसल्याने आणि पहिल्याची कालमर्यादा संपत आल्यामुळे ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. त्यांच्याकडून केंद्रावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींना लसीचा पहिला डोस घेऊन चार ते सहा आठवडे झाले. ४५ दिवसानंतर दुसरा डोस घ्यायचा असल्यामुळे ऑनलाईनद्वारे दिवस आणि वेळेची नोंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

....

लसीकरण केंद्र

एकूण केंद्र -१८९

शासकीय -११०

खासगी -७९

कोविशिल्ड -१८५

कोव्हॅक्सिन -५

बुधवारी सुरू असलेले केंद्र-३

नागपूर शहरातील लसीकरण (१२ मेपर्यंत)

पहिला डोस

आरोग्यसेवक - ४४,२६३

फ्रंटलाईन वर्कर - ४९,९०२

१८ वर्षांवरील -११,१४२

४५ वर्षांवरील - १,०९,७२२

४५ वर्षांवरील आजारी - ७८,०४४

६० वर्षांवरील - १,६४,६१२

एकूण - ४,५७,६८४

दुसरा डोस

आरोग्यसेवक - २१,४७२

फ्रंटलाईन वर्कर - १४,७६४

४५ वर्षांवरील - १८,९५८

४५ वर्षांवरील आजारी - १३,१४३

६० वर्षांवरील -५,८१,६३०

दुसरा डोस एकूण-१,२६,४६७

एकूण लसीकरण - ५,८४,१५१

Web Title: Corona Warrior awaits second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.