शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus in Nagpur : नागपुरात एका दिवसात सर्वाधिक १० मृत्यू , ३०५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:04 IST

नागपूर जिल्ह्यात कोविडने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून १० जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील २२५ आणि ग्रामीणमधील ८० संसर्गित रुग्ण आहेत.

ठळक मुद्देकोविड-१९ : ३७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोविडने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून १० जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील २२५ आणि ग्रामीणमधील ८० संसर्गित रुग्ण आहेत. जिल्ह्यासोबतच शहरातीलही ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे. कोरोना संसर्गित रुग्णांची एकूण संख्या ४,७९२ आणि मृत रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. यासोबतच बुधवारी सर्वाधिक ३७९ रुग्ण बरे होऊ घरी परतले ही आनंदाची बाबही आहे. आतापर्यंत एकूण ३०६९ रुग्ण बरे झालेले आहेत.दोन दिवसापूर्वी २७ जुलै रोजी जिल्ह्यात २७४ पॉझिटिव्ह रुग्ण आणि १० जणांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात ११५ दिवसात मृतांची संख्या १०० वर पोहोचली आहे. मागील एका आठवड्यापासून नागपूर जिल्ह्यात कोविड-१९ चा संसर्ग अनियंत्रित झाला आहे. मेडिकलमध्ये ५ संसर्गीत रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एका रुग्णाचा रिपोर्ट अमरावतीत पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तिचा मृत्यू अमरावती जिल्ह्यातच गणला जाईल. उर्वरित ४ मृतांमध्ये यशोधरानगर येथील ५९ वर्षीय पुरुष, रामबाग येथील ५० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष आणि वरुड अमरावती येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये श्वास घेण्यासोबतच हायपर टेंशन आणि डायबिटीजचाही त्रास होता. मेयोमध्ये ६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पंचशीलनगर येथील ५० वर्षीय महिला, मध्यप्रदेश बैतुल येथील २० वर्षीय महिला, गांधीबाग येथील ५८ वर्षीय पुरुष, नारी रोड येथील ६८ वर्षीय पुरुष, आरएमएस कॉलनी ७५ वर्षीय महिला, भारतनगर कळमना येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज मृत रुग्णांमधील नागपूर शहरातील ८ व २ शहराबाहेरचे आहेत.प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेयोच्या प्रयोगशाळेत २८, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ६४, एम्सच्या प्रयोगशाळेत ६४, नीरी च्या प्रयोगशाळेत २५, माफसूच्या प्रयोगशाळेत ५६, खासगी प्रयोगशाळेत ३५, एटीजन टेस्टमध्ये १५ पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४.४ टक्के इतके आहे.अ‍ॅक्टिव्ह १६१४स्वस्थ ३०६९मृत १०९डिलिव्हरीनंतर आईचा मृत्यू, नवजात बाळ सुखरूपमेयो रुग्णालयात पॉझिटिव्ह महिलेने एका सुदृढ बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तिचा मृत्यू झाला. नवजात बाळाचे वजन ३ किलो आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुलताई बैतूल येथील २० वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत मेयोमध्ये दाखल करण्यात आले. डिलिव्हरीनंतर तिचा मृत्यू झाला. मेयोचे उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले की, डिलिव्हरीनंतर कोविड पॉझिटिव्ह महिलेच्या मृत्यूचे हे नागपुरातील पहिलेच प्रकरण आहे. सुरक्षित प्रसूती करून नवजात बाळाला वाचवण्यात आले. महिलेला गंभीर अवस्थेत प्रसवपीडेदरम्यान भरती करण्यात आले होते. त्यांना प्रेगनन्सी हायपरटेन्शनसह अनेक समस्या होत्या. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना दीड दिवसापासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नवजात बाळ पूर्णपणे स्वस्थ आहे. त्यामुळे सध्यातरी त्याची तपासणी करण्यात आलेली नाही. महिलेची सर्जरी स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत उईके, अधीक्षक डॉ. रवी चव्हाण, कोविड इन्चार्ज डॉ. बिटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.रेल्वेतील वरिष्ठ अभियंता पॉझिटिव्हनागपूर रेल्वेस्थानकावर कार्यरत एक वरिष्ठ अभियंता पॉझिटिव्ह निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित अभियंता कॅरेज अ‍ॅण्ड वॅगन विभागात कार्यरत आहे. २४ जुलैपासून तो कार्यालयात आला नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कुटुंबीयांनी आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. या अभियंत्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांची तपासणी तसेच त्यांना होम क्वरंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी रेल्वे सुरक्षा दलाचे १६ जवान पॉझिटिव्ह आले होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर