शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

CoronaVirus in Nagpur : नागपुरात समाधानकारक, १११२ रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 23:36 IST

सलग चार दिवसांपासून रुग्णसंख्या हजारावर गेली असताना शनिवारी काहिशी घट आली. विशेष म्हणजे, ९२१ नव्या रुग्णांची भर पडली असताना त्यापेक्षा अधिक, १११२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानकारक बाब आहे. मात्र, मृत्यूचे सत्र सुरूच आहे. ३३ रुग्णांचे बळी गेल्याने मृत्यूची संख्या ९७९ वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग चार दिवसांपासून रुग्णसंख्या हजारावर गेली असताना शनिवारी काहिशी घट आली. विशेष म्हणजे, ९२१ नव्या रुग्णांची भर पडली असताना त्यापेक्षा अधिक, १११२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानकारक बाब आहे. मात्र, मृत्यूचे सत्र सुरूच आहे. ३३ रुग्णांचे बळी गेल्याने मृत्यूची संख्या ९७९ वर पोहचली आहे.रुग्णांची एकूण संख्या २७०१५ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांवर आले होते. नंतर रुग्ण बरे होण्याची स्थिती सुधारत गेली. आज शहरातील ९२६ तर ग्रामीणमधील १८६ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये शहरातील १२,४७९ तर ग्रामीणमधील ४४८८ असे एकूण १६,९६७ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे हे प्रमाण ६२.८१ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या मेयो, मेडिकल, एम्स, कोविड केअर सेंटर व खासगी हॉस्पिटलमध्ये ९०६९ रुग्ण उपचार घेत आहेत. यात शहरातील ६८४२ तर ग्रामीणमधील २२२७ रुग्ण आहेत. ५३८६ मधून ४४६५ चाचण्या निगेटिव्हशहरात आज २००६ तर ग्रामीणमध्ये २२४ अशी एकूण २२३० रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी शहरात २६१४ तर ग्रामीणमध्ये ५४२ रुग्णांची करण्यात आली. एकूण ५३८६ चाचण्यांमधून ४४६५ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. अ‍ॅन्टिजन चाचणीत ४९३ तर आरटी-पीसार चाचणीत ४२८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत २,४६,२५४ चाचण्या करण्यात आल्या. यात २७०१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. -खासगी हॉस्पिटलमध्ये ८४ मृत्यूशहरात १९ खासगी हॉस्पिटलमधून कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहे. आतापर्यंत या हॉस्पिटलमध्ये ८४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मेडिकलमध्ये आज १४ तर मेयोमध्ये १५ रुग्णांचे मृत्यू झाले. आतापर्यंत मेडिकलमध्ये ४७२ तर मेयोमध्ये ४११ मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांमध्ये ५०वर्षांवरील रुग्णांची संख्या सर्वाधिक असून पुरुषांची संख्या मोठी आहे.शहरात ६४३ तर ग्रामीणमध्ये २७६ पॉझिटिव्हशहरात आज ६४३, ग्रामीणमध्ये २७६ तर जिल्ह्याबाहेरील दोन असे ९२१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत शहरात एकूण २०६८७, ग्रामीणमध्ये ६०५१ तर जिल्हाबाहेर २७७ असे एकूण २७०१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात आज२७, ग्रामीणमध्ये चार तर जिल्ह्याबाहेर दोन रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.दैनिक संशयित : ५३८६बाधित रुग्ण : २७०१५बरे झालेले : १६,९६७उपचार घेत असलेले रुग्ण : ९०६९मृत्यू :९७९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर