शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:03 IST

कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढल्याने ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मागील १८ दिवसात तब्बल १०२४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मंगळवारी यात १०२४ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १५६३७ वर पोहचली.

ठळक मुद्दे१०२४ नव्या रुग्णांची भर, ३७ मृत्यू : ग्रामीण भागातील १२१, शहरातील ९०३ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढल्याने ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मागील १८ दिवसात तब्बल १०२४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मंगळवारी यात १०२४ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १५६३७ वर पोहचली. ३७ रुग्णांचा मृत्यूचीही नोंद झाल्याने मृतांची संख्या ५४९ झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील १२१ तर शहरातील ९०३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. ३१जुलै रोजी कोरोनाबाधितांची संख्या ५३९२ होती, गेल्या १८ दिवसात यात तीन पट वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. यात वाढत्या मृत्यूसंख्येने चिंता वाढवली आहे. आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) कोरोनाबाधित ११ रुग्णांचे मृत्यू झाले. यात लाकडी पूल येथील ६२ वर्षीय महिला, जरीपटका येथील ७३ वर्षीय पुरुष, नाईक तलाव येथील ६६ वर्षीय महिला, मिनीमाता नगर पारडी येथील ५० वर्षीय महिला, रामनगर कामठी येथील ७५ वर्षीय पुरुष, पवार नगर हुडकेश्वर रोड येथील ७९ वर्षीय पुरुष, सिंधीवन ताजबाग येथील ४९ वर्षीय महिला, चिखली येथील ५७ वर्षीय पुरुष, मोहननगर खलासी लाईन येथील ६७ वर्षीय पुरुष, पाचपावली येथील ६५वर्षीय पुरुष व नंदनवन येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. उर्वरीत मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आज ग्रामीणमध्ये ४, शहरात ३० तर जिल्ह्याबाहेरील तीन अशी ३४ मृतांची नोंद झाली.खासगी लॅबमधून ३३७ पॉझिटिव्हमेयो, मेडिकल व एम्समध्ये सर्वाधिक चाचणी होत असलीतरी त्या तुलनेत खासगी लॅबमधून आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ३३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीत ३७० रुग्णांचे निदान झाले. या शिवाय, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४७, मेयोच्या प्रयोगशाळेतून ११२, एम्सच्या प्रयोगशाळेतून १५२, नीरीच्या प्रयोगशाळेतून ६ असे एकूण १०२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज २८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७१९६ झाली आहे. सध्या ६३२७ रुग्ण उपचार घेत आहेत.मध्यवर्ती कारागृहातील सर्व रुग्ण बरेमध्यवर्ती कारागृहातील बंदिवानासह अधिकारी, कर्मचारी असे २१६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. कारागृह प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत कारागृहात कोविड केअर सेंटर सुरू केले, तर लक्षणे असलेल्या रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले. तातडीच्या उपचारामुळे सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही.दैनिक संशयित : ३०४७बाधित रुग्ण : १५६३७बरे झालेले : ७१९६उपचार घेत असलेले रुग्ण : ६३२७मृत्यू : ५४९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या