शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

CoronaVirus in Nagpur : सलग १४व्या दिवशी रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 00:03 IST

Corona Virus Decrease in number of patients मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कोरोना रुग्णसंख्येतील घट सलग १४ व्या दिवशी कायम होती. विशेष म्हणजे, १२ मार्चनंतर म्हणजे, दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दोन हजाराखाली आली. शुक्रवारी १९९६ रुग्णांची नोंद झाली. परंतु मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. आज ७० रुग्णांचे मृत्यू झाले. जिल्ह्यात रुग्णांची एकूणच संख्या ४,६०,६०० झाली असून मृतांची संख्या ८,४७२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे१९९६ रुग्ण व ७० मृत्यूची नोंद : दोन महिन्यानंतर रुग्णसंख्या २ हजाराखाली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कोरोना रुग्णसंख्येतील घट सलग १४ व्या दिवशी कायम होती. विशेष म्हणजे, १२ मार्चनंतर म्हणजे, दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दोन हजाराखाली आली. शुक्रवारी १९९६ रुग्णांची नोंद झाली. परंतु मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. आज ७० रुग्णांचे मृत्यू झाले. जिल्ह्यात रुग्णांची एकूणच संख्या ४,६०,६०० झाली असून मृतांची संख्या ८,४७२ वर पोहचली आहे.

कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० पासून सुरू झाली. सप्टेंबर महिन्यात ती उच्चांकावर होती. ऑक्टोबर महिन्यापासून ही लाट ओसरू लागली. त्यानंतर तीन महिने ५००च्या खाली रुग्णसंख्या होती. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढायला लागली. मार्च महिन्यात कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे शासनाने घोषित केले. एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १ मे रोजी सहा हजारावर असलेली रुग्णसंख्या ३ मे रोजी पाच हजाराखाली आली. ८ मे रोजी चार हजाराखाली, १० मे रोजी तीन हजाराखाली तर १४ मे रोजी दोन हजाराखाली आली. आज १४,१५१ चाचण्या झाल्या असून ‘पॉझिटिव्हीटी’चा दर १४ टक्क्यांवर आला. ४९६५ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी वाढून ८९ टक्क्यांवर गेली आहे.

शहरात ११३२ तर ग्रामीणमध्ये ८५१ रुग्ण

शहरात आज १०,८८९ चाचण्यामधून ११३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले व ३५ रुग्णांचे मृत्यू झाले. ग्रामीणमध्ये ३२६२ चाचण्यांमधून ८५१ रुग्णांची नोंद झाली तर २२ रुग्णांचे जीव गेले. जिल्हाबाहेरील १३ रुग्ण व तेवढ्याच रुग्णांचे मृत्यू झाले.

८०३४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

नागपूर जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ८०३४ रुग्ण उपचार घेत आहेत. ३१,०२२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. एकूण ३९,०५६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरात १८,७५९ तर ग्रामीणमध्ये २०,२९७ रुग्ण आहेत.

:: रुग्णसंख्येतील घट

१ मे : ६५७६ रुग्ण

२ मे ५००७ रुग्ण

३ मे ४९८७ रुग्ण

८ मे ३८२७ रुग्ण

१० मे २५३० रुग्ण

१४ मे १९९६ रुग्ण

:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १४,१५१

ए. बाधित रुग्ण :४,६०,६००

सक्रिय रुग्ण : ३९,०५६

बरे झालेले रुग्ण :४,१३,०७२

ए. मृत्यू : ८,४७२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर