शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा धुमाकूळ, ६,५८९ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 22:00 IST

Corona virus, Nagpur news कोरोनाने नागपूर जिल्हात धुमाकूळ घातला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. शुक्रवारी ६,५८९ नव्या रुग्णांची भर पडली. शिवाय, २४ तासांत ६४ रुग्णांचा जीव गेल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देमागील तीन दिवसांत नवे उच्चांक : ६४ रुग्णांचा मृत्यू : कोरोनाचे ४९,३४७ सक्रिय रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाने नागपूर जिल्हात धुमाकूळ घातला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. शुक्रवारी ६,५८९ नव्या रुग्णांची भर पडली. शिवाय, २४ तासांत ६४ रुग्णांचा जीव गेल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. रुग्णांची एकूण संख्या २,६६,२२४ झाली असून मृतांची संख्या ५,६४१ वर पोहचली. धक्कादायक म्हणजे, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत ४,२५० ने वाढ झाली. सध्याच्या स्थितीत ४९,३४७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

एकीकडे कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असताना दुसरीकडे वैयक्तिक कर्तव्यात अजूनही बरेच नागरिक कसूर करीत असल्याचे भयानक चित्र आहे. विना मास्क, विना शारीरिक अंतर व विना सॅनिटायझेशनमुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आता औषधोपचाराचाही तुटवडा पडल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. स्वत:हून जबाबदारी न घेतल्यास हे संकट आणखी गडद होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

चाचण्यांची विक्रमी नोंद

शुक्रवारी रुग्णसंख्येसोबतच चाचण्यांचीही विक्रमी नोंद झाली. २२,७९७ चाचण्या झाल्या. यात १७,०४२ आरटीपीसीआर तर ५,७५५ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. यातून १६,३०८ संशयितांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. सर्वाधिक , २५२३ चाचण्या मेडिकलमध्ये झाल्या. मेयोमध्ये २३०४, एम्समध्ये १९८३, नीरीमध्ये ३३९, खासगी लॅबमध्ये ८९९७ चाचण्या झाल्या. या चाचण्या मागील २४ तासांतील आहेत.

शहरात ४०१६ तर ग्रामीणमध्ये २४६६ रुग्ण पॉझिटिव्ह

शहरात पहिल्यांदाच एका दिवसातील बाधितांची नोंद ४ हजारांवर गेली. ४,०१६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ग्रामीणमध्ये २,४६६ बाधित रुग्ण आढळून आले. मृतांमध्ये शहरातील ३७ तर, ग्रामीणमध्ये २० मृत्यू आहेत. जिल्ह्याबाहेरील ७ रुग्ण व ७ मृत्यू नोंदविण्यात आले.

३६,६११ रुग्णांचे घरीच उपचार

कोरोनाचे ४९,३४७ रुग्ण सक्रिय असून यातील ३६,६११ रुग्णांचे घरीच उपचार सुरू आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये १२,७३६ रुग्ण उपचाराखाली आहेत. आज २,१७५ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २,११,२३६ झाली. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनामुक्त होण्याचा दर घसरून ७९ टक्क्यांवर आला आहे.

१५ दिवसांतील रुग्णसंख्येची विक्रमी नोंद

२६ मार्च : ४०९५

२ एप्रिल : ४११०

७ एप्रिल : ५३३८

८ एप्रिल : ५५१४

९ एप्रिल : ६४८९

कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या: २२,७९७

ए. बाधित रुग्ण :२,६६,२२४

सक्रिय रुग्ण : ४९,३४७

बरे झालेले रुग्ण :२,११,२३६

ए. मृत्यू : ५,६४१

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर