शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:56 PM

कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर गेल्याने धाकधुक वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या ५००वर आहे. गुरुवारी पुन्हा ७२७ नव्या रुग्णांची भर पडली. यात ग्रामीणमधील ९२ तर शहरातील ६६५ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ११,७०९ झाली आहे. आज १८ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ४२० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, ३१ मे रोजी बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ७१.४८ टक्के होते, आता ते ४७.११ टक्क्यांवर आले आहे.

ठळक मुद्दे७२७ रुग्ण पॉझिटिव्ह, १८ रुग्णांचा मृत्यू : ग्रामीणमधील ९२ तर शहरातील ६६५ रुग्ण बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर गेल्याने धाकधुक वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या ५००वर आहे. गुरुवारी पुन्हा ७२७ नव्या रुग्णांची भर पडली. यात ग्रामीणमधील ९२ तर शहरातील ६६५ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ११,७०९ झाली आहे. आज १८ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ४२० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, ३१ मे रोजी बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ७१.४८ टक्के होते, आता ते ४७.११ टक्क्यांवर आले आहे.जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मेयोमध्ये आठ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचे वय ४० ते ७० दरम्यान होते. यातील बहुसंख्य रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचा विकार होता. मृतांमध्ये हिवरीनगर येथील ६२ वर्षीय महिला, सदर आझाद चौक येथील ६५ वर्षीय पुरुष, लालगंज येथील ४३ वर्षीय पुरुष, बडकस चौक महाल येथील ७३ वर्षीय पुरुष, तांडापेठ येथील ६६वर्षीय पुरुष, डागा हॉस्पिटलजवळील गांजाखेत येथील ७० वर्षीय महिला, नागसेनवन विनोबाभावे नगर येथील ५७ वर्षीय पुरुष व गांधीबाग येथील ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या १८ रुग्णांमध्ये एक ग्रामीण भागातील, १६ शहरातील तर एक जिल्ह्याबाहेरील आहे. इतर मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.अ‍ॅण्टिजेन चाचणीत ३०१ रुग्ण पॉझिटिव्हशहरात १० झोनमधील आरोग्य केंद्रांवर व ग्रामीण भागातही लक्षणे असलेल्या रुग्णांची नि:शुल्क रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली जात आहे. यामुळे चाचण्यांची संख्या वाढली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज ३०१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. या शिवाय, आरटीपीसीआर चाचणी करीत असलेल्या मेडिकलमधून ९१, मेयोमधून १०३, एम्समधून ५६, नीरीमधून ३२, माफसूमधून ३८, खासगी लॅबमधून १०६ असे एकूण ७२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज १८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ५,५१६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ग्रामीणमध्ये ५५१ तर शहरात १,१०६ असे एकूण १,६५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.व्हीएनआयटी सीसीसीमधील डॉक्टर, कर्मचारी पॉझिटिव्हव्हीएनआयटी येथील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका व कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या या ठिकाणी २०२ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आपली चाचणी केली असता तब्बल आठ जण पॉझिटिव्ह आले.दैनिक संशयित : ३५४बाधित रुग्ण : ११,७०९बरे झालेले : ५,५१६उपचार घेत असलेले रुग्ण : १,६५७मृत्यू : ४२०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर