शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधितांचा ५० हजारांचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:13 IST

वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मागील सात दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीने दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी १,५७८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्दे१,५७८ पॉझिटिव्ह, ४१ मृत्यू : नवीन रुग्णांपेक्षा बऱ्या होणाºया रुग्णांची संख्याही अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मागील सात दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीने दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी १,५७८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५०,१२८ तर मृतांची संख्या १,६१३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, नवीन रुग्णांपेक्षा बºया होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दुसऱ्या दिवशीही दिलासादायक चित्र होते.नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून भयावह आकडे समोर येत आहेत. या आठवड्यात ११,९८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ३४९ रुग्णांचा जीव गेला. आतापर्यंतच्या आकडेवारीतील हा उच्चांक आहे. मागील सात दिवसात दोन वेळा रुग्णसंख्या दोन हजारावर गेली होती. तर मृत्यूचा आकडा ५८वर पोहचला होता. यामुळे पुढील आठवड्यात रुग्णसंख्या कमी होणार की वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १२७०, ग्रामीणमधील ३०६ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये शहरातील २७, ग्रामीणमधील १२ तर जिल्ह्याबाहेरील दोघांचा समावेश आहे.९,३०६ चाचण्यांमधून ७,४३८ रुग्ण निगेटिव्हशहर आणि ग्रामीणमध्ये ९,०१६ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ७,४३८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. यात ५,४७१ संशयित रुग्णांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या करण्यात आल्या. ५७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३,८३५ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यात १००५ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. एम्स प्रयोगशाळेमधून ३१, मेडिकलमधून १९८, मेयोमधून १२४, नीरीमधून १०४ तर खासगी लॅबमधून ५४८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.मेयोत ३९४ तर मेडिकलमध्ये ३९८ रुग्णशहरात मेयो, मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलच्या १२०० खाटा आहेत. यात मेयोमध्ये ३९४ तर मेडिकलमध्ये ३९८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून केवळ २०० खाटा शिल्लक आहेत. जिल्ह्यात दुसरे कुठले शासकीय कोविड हॉस्पिटल नसल्याने रुग्णसेवेत अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.१,६३३ कोरोनाबाधित रुग्ण बरेकोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा राहत असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या २६५९ २२२२तर शनिवारी १६३३ होती. ही एक समाधानकारक बाब असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ७४.५५ टक्क्यांवर गेले आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७,३७१ झाली आहे. सध्याच्या स्थितीत ११,१४४ रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ९,०१६बाधित रुग्ण : ५०,१२८बरे झालेले : ३७,३७१उपचार घेत असलेले रुग्ण : ११,१४४मृत्यू : १,६१३

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर