CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधितांचा ५० हजारांचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:11 AM2020-09-13T00:11:42+5:302020-09-13T00:13:35+5:30

वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मागील सात दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीने दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी १,५७८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

Corona virus in Nagpur: Corona virus crosses 50,000 in Nagpur | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधितांचा ५० हजारांचा आकडा पार

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधितांचा ५० हजारांचा आकडा पार

Next
ठळक मुद्दे१,५७८ पॉझिटिव्ह, ४१ मृत्यू : नवीन रुग्णांपेक्षा बऱ्या होणाºया रुग्णांची संख्याही अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मागील सात दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीने दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी १,५७८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५०,१२८ तर मृतांची संख्या १,६१३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, नवीन रुग्णांपेक्षा बºया होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दुसऱ्या दिवशीही दिलासादायक चित्र होते.
नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून भयावह आकडे समोर येत आहेत. या आठवड्यात ११,९८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ३४९ रुग्णांचा जीव गेला. आतापर्यंतच्या आकडेवारीतील हा उच्चांक आहे. मागील सात दिवसात दोन वेळा रुग्णसंख्या दोन हजारावर गेली होती. तर मृत्यूचा आकडा ५८वर पोहचला होता. यामुळे पुढील आठवड्यात रुग्णसंख्या कमी होणार की वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १२७०, ग्रामीणमधील ३०६ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये शहरातील २७, ग्रामीणमधील १२ तर जिल्ह्याबाहेरील दोघांचा समावेश आहे.

९,३०६ चाचण्यांमधून ७,४३८ रुग्ण निगेटिव्ह
शहर आणि ग्रामीणमध्ये ९,०१६ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ७,४३८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. यात ५,४७१ संशयित रुग्णांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या करण्यात आल्या. ५७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३,८३५ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यात १००५ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. एम्स प्रयोगशाळेमधून ३१, मेडिकलमधून १९८, मेयोमधून १२४, नीरीमधून १०४ तर खासगी लॅबमधून ५४८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

मेयोत ३९४ तर मेडिकलमध्ये ३९८ रुग्ण
शहरात मेयो, मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलच्या १२०० खाटा आहेत. यात मेयोमध्ये ३९४ तर मेडिकलमध्ये ३९८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून केवळ २०० खाटा शिल्लक आहेत. जिल्ह्यात दुसरे कुठले शासकीय कोविड हॉस्पिटल नसल्याने रुग्णसेवेत अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

१,६३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे
कोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा राहत असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या २६५९ २२२२तर शनिवारी १६३३ होती. ही एक समाधानकारक बाब असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ७४.५५ टक्क्यांवर गेले आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७,३७१ झाली आहे. सध्याच्या स्थितीत ११,१४४ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ९,०१६
बाधित रुग्ण : ५०,१२८
बरे झालेले : ३७,३७१
उपचार घेत असलेले रुग्ण : ११,१४४
मृत्यू : १,६१३

Web Title: Corona virus in Nagpur: Corona virus crosses 50,000 in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.