शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : कोरोना मृत्यूचा स्फोट, ६० बळी, ३६३० रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 22:01 IST

Corona virus, Nagpur news कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्युदराने नागपूर जिल्ह्यात टेन्शन वाढवले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० च्या खाली असलेली मृत्युसंख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ५० वर गेली, आता थेट ६० झाली.

ठळक मुद्देगंभीर रुग्णांच्या तुलनेत खाटांची संख्या कमी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्युदराने नागपूर जिल्ह्यात टेन्शन वाढवले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० च्या खाली असलेली मृत्युसंख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ५० वर गेली, आता थेट ६० झाली. मृत्युदर २.२४ टक्क्यांवर गेली. शिवाय, मागील दोन दिवस तीन हजारांखाली असलेली रुग्णसंख्या गुरुवारी पुन्हा ३६३० झाली. रुग्णांची एकूण संख्या २,२९,६६८ तर, मृतांची संख्या ५१५८ नोंदविण्यात आली. वाढत्या गंभीर रुग्णसंख्येने शहरात खाटांची संख्या कमी पडताना दिसून येत आहे.

कोरोनाच्या वर्षभराच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यूंची नोंद १७ सप्टेंबर रोजी झाली. एकाच दिवशी ६४ रुग्णांचे जीव गेले. त्यानंतर मृत्यूचा आकडा कमीकमी होत गेला. आता सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा मृत्यूची संख्या वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्याच्या १५ तारखेपर्यंत दैनंदिन मृत्यूची संख्या ५ ते १२ च्या दरम्यान होती. मागील सहा दिवसांपासून दररोज ५० वर मृत्यू होत आहे. यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी चाचण्यांच्या संख्येने उच्चांक गाठला. १३,९३० आरटीपीसीआर, ३९४८ रॅपिड ॲण्टिजेन मिळून १७,८७६ चाचण्या झाल्या.

शहरात ३५ तर, ग्रामीणमध्ये २१ मृत्यू

नागपूर जिल्ह्यात एकूण रुग्ण व मृत्यूमध्ये शहरातील ३५ मृत्यू व २४८१ रुग्ण आहेत. तर, ग्रामीणमध्ये २१ मृत्यू व ११४५ रुग्ण आहेत. मागील आठवड्यापासून ग्रामीणमध्ये रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीणमध्ये ऑक्सिजन खाटा कमी पडत असल्याने अनेक गंभीर रुग्णांना नागपुरात पाठविले जात आहे. परिणामी, रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

३१ हजारांवर रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

नागपूर जिल्ह्यात ३९,९७३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील ३१,११४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नसल्याने रुग्ण गंभीर होत आहेत. परिणामी, खाटांची संख्या अपुरी पडत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याच्या स्थितीत ८,८५९ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

मागील सहा दिवसांतील मृत्युसंख्या

२७ मार्च : ५४

२८ मार्च : ५८

२९ मार्च : ५५

३० मार्च : ५४

३१ मार्च : ५८

१ एप्रिल : ६०

कोरोनाची स्थिती

दैनिक चाचण्या : १७,८७६

ए. बाधित रुग्ण :२,२९,६६८

सक्रिय रुग्ण : ३९,९७३

बरे झालेले रुग्ण : १,८४,५३७

ए. मृत्यू : ५१५८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू