शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५ दिवसात कोरोनाचे ७०२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 23:22 IST

कोरोनाचा वाढता मृत्यूदर ही चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या १५ दिवसात ७०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे भीतीचे संकट आणखीच गडद झाले आहे. दुसरीकडे नवीन रुग्णांचीही दररोज मोठी भर पडत आहे. मंगळवारी १९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४८ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५५४३० झाली असून मृतांची संख्या १७५३ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे१९५७ नवे रुग्ण, ४८ मृत्यूची भर : शहरात १७०५ तर ग्रामीणमध्ये २४६ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा वाढता मृत्यूदर ही चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या १५ दिवसात ७०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे भीतीचे संकट आणखीच गडद झाले आहे. दुसरीकडे नवीन रुग्णांचीही दररोज मोठी भर पडत आहे. मंगळवारी १९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४८ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५५४३० झाली असून मृतांची संख्या १७५३ वर पोहचली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर ३.१६ टक्के आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आज शहरात १७०५, ग्रामीणमध्ये २४६ तर जिल्हाबाहेर सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत शहरात एकूण रुग्णांची संख्या ४३९६२ झाली आहे. ग्रामीणमध्ये १११२९ तर जिल्हाबाहेर ३३९ रुग्णांची नोंद आहे. आज आरटीपीसीआरच्या ३३८७ तर रॅपिड अ‍ॅन्टिजनच्या २९३४ असे एकूण ६३२१ चाचण्या झाल्या. रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीतून ६९५ रुग्ण पॉझटिव्ह आले व २२३९ रुग्ण निगेटिव्ह आले, तर आरटीपीसीआर चाचणीतून १२५२ रुग्णांची नोंद झाली व २०३१ रुग्ण निगेटिव्ह आले.शहरात १३२१ तर ग्रामीणमध्ये २७५ मृत्यूआज जिल्हात नोंद झालेल्या मृतांमध्ये शहरातील २९, ग्रामीण भागातील १३ तर जिल्हाबाहेरील सहा मृत्यू आहे. एकूण मृतांमध्ये शहरातील १३२१, ग्रामीणमधील २७५ तर जिल्ह्याबाहेरील १५७ आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने भीतीचे वातावरण आहे. मृतांमध्ये सर्व वयोगटातील रुग्ण असलेतरी ५० ते ७० या वयोगटातील सर्वाधिक आहेत. वाढते वय, जुनाट अनियंत्रित आजार आणि रुग्णालयात पोहचण्यास उशीर, हे तीन कारण मृत्यूची संख्या वाढवित असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.बरे होण्याचे प्रमाण ४६ वरून ७६ टक्क्यांवरएकीकडे रुग्ण व मृत्यूची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण ७६.३७ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, १६ आॅगस्ट रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी, ४६.७४ टक्क्यांवर होते. यामुळे आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज १६६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण ४२३३३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ११३४४ रुग्ण उपचाराखाली आहेत.- शासकीयमध्ये १७२३ तर खासगीमध्ये १५७० चाचण्या शासनाच्या पाच प्रयोगशाळामिळून आज १७२३ तर खासगी लॅबमध्ये १५७० रुग्णांच्या चाचण्या झाल्या. धक्कादायक म्हणजे, शासकीय प्रयोगशाळेतील रोजच्या चाचण्यांची क्षमता २५००वर आहे. तरीही कमी तपासण्या होत आहे तर, खासगीची क्षमता याच्या तुलनेत निम्मी असताना सर्वाधिक चाचण्या होत आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत १५५, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ६१९, मेयोच्या प्रयोगशाळेत १४५, नीरीच्या प्रयोगशाळेत १८३ तपासण्या झाल्या.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६२२७बाधित रुग्ण : ५५४३०बरे झालेले : ४२३३३उपचार घेत असलेले रुग्ण : ११३४४मृत्यू :१७५३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू