शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३८ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, रुग्णसंख्या १०४३, मृत्यूसंख्या १७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 22:54 IST

सलग तिसऱ्या दिवशीही रुग्णांची संख्या ३० वर गेली. सोमवारी ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या १०४३ वर पोहचली आहे. शिवाय, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १७ झाली आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्दे‘सुपर’मधील रुग्ण पॉझिटिव्ह : महालमध्ये प्रसूतीनंतर माताही बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग तिसऱ्या दिवशीही रुग्णांची संख्या ३० वर गेली. सोमवारी ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या १०४३ वर पोहचली आहे. शिवाय, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १७ झाली आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.नागपुरात तीन दिवसांत १०२ रुग्णांची नोंद झाली. जून महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यात मृत्यूची संख्या भर घालीत आहे. आज मृत्यू झालेला ५० वर्षीय रुग्ण श्वसनाच्या आजारावरील उपचारासाठी ८ जून रोजी मेडिकलमध्ये भरती झाला. त्याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मेडिकलमध्ये १७९ रुग्ण उपचार घेत आहेत.चंद्रमणीनगरातून चार रुग्ण पॉझिटिव्हनीरीच्या प्रयोगशाळेत २० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नाईक तलाव-बांगलादेश वसाहतीतून चार, मोमिनपुरा येथून पाच, हंसापुरी येथील तीन, भोईपुरा व इतवारी येथून प्रत्येकी एक, चंद्रमणीनगर येथील दोन, हिंगणा येथून तीन तर मानकापूर येथून एक २८ वर्षीय महिला आहे. या महिलेची मुंबर्ई प्रवासाची पार्श्वभूमी आहे. या सर्व रुग्णांना पाचपावली येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. मेयोच्या प्रयोगशाळेतून १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नाईक तलाव येथील सात, चंद्रमणीनगर येथील दोन तर शांतीनगर येथील एक रुग्ण आहे. शांतीनगर येथील हा रुग्ण मनपाचा कर्मचारी आहे. या सर्वांना राजनगर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. चंद्रमणीनगरातून चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वैशालीनगर येथेही कोरोनाचा शिरकावएम्सच्या प्रयोगशाळेत सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात वैशालीनगर वसाहतीतील एक रुग्ण आहे. पहिल्यांदाच या वसाहतीत रुग्णाची नोंद झाली. उर्वरित पाच रुग्णांमध्ये साईनगर हिंगण्यातील एक, एमआयडीसी रोड श्रमिकनगर येथील दोन, एमआयडीसी हिंगणा व अमरनगर एमआयडीसी हिंगणा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. हे सहाही रुग्ण वनामती येथे क्वारंटाईन होते. खासगी प्रयोगशाळेतून दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय विकारावरील उपचारासाठी भरती झालेला एक रुग्णाचा समावेश आहे. हा रुग्ण रुग्णालयातून सुटी घेऊन खासगी इस्पितळात जात असताना नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.मातृसेवा संघाने दिला मानवतेचा हातकिल्ला वॉर्ड महाल येथील एक गर्भवती महिला महालमधीलच मातृसेवा संघाच्या सूतिकागृहात भरती झाली. सोमवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला मेयोमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. याचदरम्यान प्रसवकळा सुरू झाल्या. तेथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून तातडीने पीपीई किट घातली. रुग्णालयातच तिची प्रसूती केली. मातृसेवा संघाने ऐनवेळी दिलेल्या मानवतेच्या हाताचे सर्वत्र कौतुक होत आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी अशा नऊ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.३३ रुग्णांंना डिस्चार्जएम्समधून १८, मेडिकलमधन १० तर मेयोतून पाच अशा ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एम्समधून सुटी झालेले १६ रुग्ण नाईक तलाव, लोकमान्यनगर व गुमगाव येथील एक रुग्ण आहे. आतापर्यंत ६४८ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १२७दैनिक तपासणी नमुने ५४४दैनिक निगेटिव्ह नमुने ५१०नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १,०४३नागपुरातील मृत्यू १७डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६४८डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३,५२३क्वॉरंटाईन कक्षात एकूण संशयित २,२९९पीडित- १,०४३-दुरुस्त-६४८ -मृत्यू-१७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर