शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

CoronaVirus in Nagpur : एकाच दिवसात २००० कोरोनाबाधित बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 23:41 IST

Corona virus जिल्हा माहिती कार्यालयानुसार सोमवार, २१ डिसेंबर रोजी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०३३ होती, तर मंगळवारी ही संख्या ४०५७ वर आली. त्यानुसार १९७६ रुग्ण बरे झाले.

ठळक मुद्दे३४१ नवे रुग्ण, ७ मृत्यू : कोरोनामुक्ताचे प्रमाण ९३ टक्क्यांवर

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : जिल्हा माहिती कार्यालयानुसार सोमवार, २१ डिसेंबर रोजी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०३३ होती, तर मंगळवारी ही संख्या ४०५७ वर आली. त्यानुसार १९७६ रुग्ण बरे झाले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येत बरे झालेल्या रुग्णांची ही पहिलीच घटना आहे. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३.४३ टक्क्यांवर पोहचले आहे. आज ३४१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ७ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या १२०६२८ झाली असून मृतांची संख्या ३८६४ वर पोहचली आहे.

नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी चाचण्यांची संख्या पुन्हा ५ हजारांच्या खाली गेली. ३६६९ आरटीपीसीआर तर ९९७ रॅपिड अ‍ॅण्टिजेन अशा एकूण ४६६६ चाचण्या झाल्या. एकूण चाचण्यांच्या तुलनेत ७.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांमध्ये शहरातील २७४, ग्रामीणमधील ६५ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील ३ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचे मृत्यू झाले. आज पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कमी, ३०५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ११२७०७ झाली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी ११०३९७ रुग्ण बरे झाले होते. त्यानुसार मंगळवारी एकूण २३१० रुग्ण बरे झाले.

प्रयोगशाळेच्या क्षमतेपेक्षा कमी तपासण्या

नागपूर जिल्ह्यातील सहा शासकीय प्रयोगशाळेतून कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहे. परंतु क्षमतेपेक्षा कमी चाचण्या होत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेची क्षमता हजार चाचण्या असताना आज २९९ चाचण्या झाल्या. मेयोच्या प्रयोगशाळेची क्षमताही ८०० वर असताना २१६ चाचण्या झाल्या. एम्स प्रयोगशाळेच्या चाचण्यांची क्षमता २०० वर असताना केवळ ११ चाचण्या झाल्या. माफसूच्या प्रयोगशाळेत १०२, नीरीच्या प्रयोगशाळेत १०८, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २५० चाचण्या झाल्या. या तुलनेत खासगीमध्ये सर्वात जास्त, २६८३ चाचण्या झाल्या.

दैनिक संशयित : ४६६६

बाधित रुग्ण : १२०६२८

बरे झालेले : ११२७०७

उपचार घेत असलेले रुग्ण : ४०५७

 मृत्यू : ३८६४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर