शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन चिमुकल्यांसह १८ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:01 IST

सलग दोन दिवस रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना शुक्रवारी त्या तुलनेत निम्म्याहूनही कमी रुग्णांची नोंद झाली. आज १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात दोन वर्षाची चिमुकली व अडीच वर्षाचा चिमुकला आहे.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या ९३९ : चंद्रमणीनगरात पुन्हा रुग्ण : सावित्रीबाई फुले नगरात कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग दोन दिवस रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना शुक्रवारी त्या तुलनेत निम्म्याहूनही कमी रुग्णांची नोंद झाली. आज १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात दोन वर्षाची चिमुकली व अडीच वर्षाचा चिमुकला आहे. रुग्णांची संख्या ९३९ वर पोहचली आहे. चंद्रमणीनगरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर सावित्रीबाई फुले नगर या स्लम वसाहतीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला. नागपुरात रुग्णांच्या संख्येची हजाराकडे वाटचाल असली तरी रुग्ण बरे होऊन घरी पतरणाऱ्यांची संख्या समाधानकारक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत ६१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. असे असताना, लॉकडाऊन शिथिलतेच्या या काळात अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञानी केले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सावित्रीबाई फुले नगर या स्लम वसाहतीतील अडीच वर्षाचा मुलगा आहे. प्राप्त माहितीनुसार, त्याची आई चार दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले नगर वसाहतीत आपल्या माहेरी आली होती. दोन दिवसांपूर्वी मुलाची प्रकृती खराब झाल्याने त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला असता तो पॉझिटिव्ह आला. चिमुकल्याला झालेल्या संसर्गाचा संपर्काचा शोध घेतला जात आहे.चंद्रमणीनगर हॉटस्पॉट होणार का?चंद्रमणीनगर येथील २७ वर्षीय युवक ८ जून रोजी पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण स्वत:हून मेडिकलमध्ये भरती झाला होता. या रुग्णाला मोमीनपुरा येथून लागण झाल्याचे सांगण्यात येते. याच्या कुटुंबाला व संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले असता आज ४८ वर्षीय व २५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. दाटीवटीने वसलेली ही वसाहत ‘हॉटस्पॉट’ तर होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.मोमीनपुरा, निकालस मंदिर, बजेरिया, नाईक तलाव येथेही रुग्णदोन महिन्याचा कालावधी होत असतानाही मोमीनपुरा येथून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले, बांगलादेश-नाईक तलाव येथून दोन, निकालस मंदिर, बजेरिया, टिमकी व हंसापुरी वसाहतीतही प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली.पाच रुग्ण ग्रामीण भागातीलग्रामीण भागात आज पुन्हा पाच रुग्णांची नोंद झाली. यात कोराडी सिद्धार्थ नगर येथील येथील दोन वर्षाची मुलगी, सावनेर येथील एक तर काटोल येथील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण क्वारंटाईन होते. या शिवाय, नागपुरातील एका खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये अमरावतीमधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.१८ रुग्ण बरेमेयोमधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात अकोल्यातील तीन, मोमीनपुरा व भानखेडा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मेडिकलमधून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात सात रुग्ण बांगलादेश-नाईक तलाव येथील, पाच रुग्ण मोमीनपुरा तर एक गोळीबार चौक परिसरातील आहे. असे एकूण १८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ४७४दैनिक तपासणी नमुने २८०दैनिक निगेटिव्ह नमुने २६४नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९३९नागपुरातील मृत्यू १५डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५७३डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३३४६क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २२७४पीडित- ९३९-दुरुस्त-५७३-मृत्यू-१५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर