शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १०२ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 23:29 IST

जिल्ह्यात मागील आठवड्यात ४९८ रुग्ण व १० मृत्यूची तर या आठवड्यात ६४२ रुग्ण व १३ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण व मृत्यूची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

ठळक मुद्देसात दिवसांत ६४२ रुग्ण, १३ मृत्यू : रुग्णसंख्या २८७६, मृतांची संख्या ४७

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात ४९८ रुग्ण व १० मृत्यूची तर या आठवड्यात ६४२ रुग्ण व १३ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण व मृत्यूची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शनिवारी पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या १०२ वर पोहचली. रुग्णांची एकूण संख्या २८७६ झाली. मेयो रुग्णालयात दोन रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या ४७ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात या महिन्यात आतापर्यंत २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या दोन मृतांपैकी एक ७२ वर्षीय पुरुष टिमकी येथील होते. या रुग्णाला २९ जून रोजी मेयोत दाखल केले. रुग्णाला उच्चरक्तदाब, सीओपीडी आदी आजार होते. उपचार सुरू असताना आज पहाटे मृत्यू झाला. दुसरी मृत महिला ही २६ वर्षीय मोमीनपुरा येथील रहिवासी होती. या रुग्णाला १६ जुलै रोजी मेयोत भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज १२ वाजता मृत्यू झाला. या रुग्णाला सारीची लक्षणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या ४७ रुग्णांमध्ये ३१ मृत्यू नागपूर जिल्ह्यातील तर १६ मृत्यू जिल्हा बाहेरील आहेत. मेयोमध्ये ४८ रुग्ण पॉझिटिव्हमेयोच्या प्रयोगशाळेत आज तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. दोन दिवसापासून बंद असलेली मेडिकलची प्रयोगशाळा आज सुरू झाली. येथून चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. एम्समधून आठ, नीरीमधून एक, खासगी लॅबमधून १८, अ‍ॅण्टीजन चाचणीतून २१ तर इतर प्रयोगशाळेतून दोन असे १०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयो, मेडिकल, एम्समधून ६५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७९८ झाली आहे.ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या ५४२शहरासोबत ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या ५४२ वर पोहचली आहे. यात नागपूर तालुक्यातील ५२, कामठी तालुक्यात १६०, काटोल तालुक्यात ७१, सावनेर तालुक्यात १६, पारशिवनी तालुक्यात १९, कळमेश्वर तालुक्यात १६, नरखेड तालुक्यात ६, हिंगणा तालुक्यात १२९, उमरेड तालुक्यात २, रामटेक तालुक्यात १२, कुही तालुक्यात १ व मौदा तालुक्यात २ रुग्णांची नोंद आहे. भिवापुर तालुक्यात अद्यापही रुग्णांची नोंद झालेली नाही. या शिवाय एसआरपीएफचे १५ तर कामठी हॉस्पिटलमधील ४१ रुग्णांचा यात समावेश आहे.या वसाहतीत आढळले रुग्णबिनाकी मंगळवारी १२, भारतनगर ४, मिसळ ले-आऊट १, लक्ष्मीनगर १, झिंगाबाई टाकळी १, अजनी चौक १, मिनीमातानगर १, रामेश्वरी १, नारी १, शंकरनगर १, सिव्हील लाईन्स ३, कळमना रोड १, तिरुपती अपार्टमेंट १, पोलीस लाईन टाकळी १, आदर्शवाडी सीताबर्डी २, कुऱ्हाडकरपेठ १, मध्यवर्ती कारागृह क्वॉर्टर १, नरेंद्रनगर १, सोमवारी क्वॉर्टर २, मोमीनपुरा १, बडा ताजबाग १, हसनबाग १, भगवाननगर १, वकीलपेठ १, गोरेवाडा १, लकडगंज १, व्यंकटेशनगर १, रामनगर १, नेहरू नगर १, कमाल चौक १, निर्मल नगरी ३ असे एकूण ५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मनपामध्ये नोंद झालेले हे रुग्ण आहेत.जरीपटका आणि यशोधरानगर ठाण्यात कोरोना शिरलाजरीपटका आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यातही कोरोनाने शिरकाव केला. भंगार चोराच्या टोळीला ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी करणारे एक पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचा रायटर असे दोघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. या दोघांच्या संपर्कातील अन्य दोघांना शनिवारी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे यशोधरा नगर पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य चौघांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांनाही याच सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. आजपर्यंत एकूण १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून या सर्वांवर उपचार सुरू आहेत.संशयित : २८४१बाधित रुग्ण : २८७६घरी सोडलेले : १७९८उपचार घेत असलेले रुग्ण : १०३१मृत्यू : ४७

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर