शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : नागपुरातही बार, रेस्टॉरेंट, पानठेले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 20:47 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा-मनपा प्रशासनाचा स्वागतार्ह निर्णय : लोकमतच्या जनहितार्थ मोहिमेला यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लोकांची गर्दी कमी करणे अत्यावश्यक आहे. लोकांचा कमीत कमी संपर्क यावा व शक्यतोवर लोकांनी घरीच राहावे, यासाठी आज बुधवारी जिल्हा व मनपा प्रशासनाने स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजाराबाबत नागपूर जिल्ह्यात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. जगातील इतर देशांतील अनुभव लक्षात घेता कोरोना विषाणूचा संसर्ग चक्राकार पद्धतीने पसरतो. या अनुभवाच्या आधारे विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क यावा व शक्यतो घरात राहणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) (५) व (१८) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून उपरोक्त आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या धर्तीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीसुद्धा शहरातील गर्दी कमी करण्यासाठी शहरातील सर्व शॉपिंग मॉल, दुकाने व आस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. परंतु अत्यावश्यक किराणा सामान, दूध, व भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू व औषधालय यातून वगळण्यात आले आहेत.लग्न समारंभ व कौटुंबिक सोहळेही टाळामनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी आदेश जारी करीत शहरातील सर्व मंगल कार्यालये, सभागृहे, बॅन्क्वेट हॉल, क्लबधारकांना असे निर्देश दिले आहेत की, लग्न कार्य किंवा कौटुंबिक कार्यक्रम शक्यतोवर रद्द करावे किंवा पुढे ढकलावे. असे लग्न व इतर कार्यक्रम अत्यावश्यक असल्यास शक्यतोवर ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही, याकरिता योग्य उपाययोजना कराव्यात. कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही त्याकरिता सर्व आवश्यक ती दक्षता व खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.हे राहणार बंदसर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम, बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले, शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना आदीहे राहणार सुरूअत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, औषधालयशहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू आहे. तेव्हा नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपली काळजी घ्यावी. शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. जास्तीत जास्त घरीच राहावे.रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारीनागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी लग्न समारंभ व इतर कौटुंबिक समारंभ आयोजित करणे व इतरांच्या कार्यक्रमास जाणे टाळावे.तुकाराम मुंढे, मनपा आयुक्तशहरात जमाव बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तेव्हा लोकांनी गर्दी करू नये. शक्यतोवर घरीच राहावे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास कारवाई होईल, तेव्हा सहकार्य करावे.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShoppingखरेदीnagpurनागपूर