शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘टीम वर्क’मुळेच कोरोना नियंत्रणात : पोलीस आयुक्त उपाध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:14 IST

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपूर पोलिसांनी महापालिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने एक टीम वर्क म्हणून यात यश प्राप्त केले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. कोरोनाच्या या लढाईत पोलिसांना साथ दिल्याबद्दल प्रशासन आणि नागरिकांचे त्यांनी आभारही मानले.

ठळक मुद्देपोलीस जीव धोक्यात घालून लढताहेत, प्रत्येक कोविड योद्ध्यास याचे श्रेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपूरपोलिसांनी महापालिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने एक टीम वर्क म्हणून यात यश प्राप्त केले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. कोरोनाच्या या लढाईत पोलिसांना साथ दिल्याबद्दल प्रशासन आणि नागरिकांचे त्यांनी आभारही मानले.पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पोलिसांसह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांचीही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पोलिसांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘टीम वर्क’ म्हणून काम केले. लॉकडाऊननंतर पोलीस रस्त्यांवर दिवसरात्र तैनात होते. रस्त्यावर सरकारचे धोरण व कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. सीपी ते पीसी (शिपाईपर्यंत) सर्वच रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. सव्वा दोन महिन्यांपासून पोलीस डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. एका वेळी ६०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात असतात. पोलीस कर्मचारी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत ड्युटी बजावत आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये तर पोलिसांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. तेथून कुणालाही बाहेर जाऊ दिले जात नाही आणि बाहेरच्या व्यक्तीलाही आत प्रवेश दिला जात नाही आहे. यामुळे कोरानाचा प्रादुर्भाव वाढलेला नाही. यात थोडीशीही चूक झाली असती तर परिस्थिती अतिशय गंभीर झाली असती. कंटेनमेंट झोनमध्ये काम करणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले. शासकीय यंत्रणेत पोलीसच सर्वाधिक प्रभावित होत आहेत.डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, कोविड संसर्गिक आणि संशयित लोकांना रुग्णालयात किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. यादरम्यान अनेकदा संघर्षाचीही परिस्थिती निर्माण झाली. परंतु पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने शहरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. उलट पोलिसांनी समजावल्यानंतर विरोध करणारेही समर्थन करायला लागले. अनेक नागरिकांनी कोविड योद्धा बनून पोलिसांची मदत केली. धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांची मदत केली. यामुळे नागपुरात कोरोना मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात राहिला. या यशाचे श्रेय पोलिसांना देण्याच्या प्रश्नावर डॉ. उपाध्याय म्हणाले, पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. यशाचे श्रेय हे प्रत्येक कोरोना योद्ध्यास द्यायला हवे.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या