शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

आता ४० मिनिटांत कोरोनाची चाचणी; राज्याला मिळणार ७९ ट्रूनॅट मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 09:09 IST

‘आरटी-पीसीआर’ या यंत्रावर कोरोना चाचणीचे निदान होणासाठी साधारण चार ते पाच तासांचा वेळ जातो. तो वेळ कमी करण्यासाठी व तातडीने जास्तीत जास्त नमुने तपासणीसाठी केंद्राने राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाला ७९ ‘ट्रूनॅट यंत्र’ उपलब्ध करून दिले आहे.

ठळक मुद्देनागपूर मनपा व जिल्हा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोल्यात होणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कसुमेध वाघमारेनागपूर : ‘आरटी-पीसीआर’ या यंत्रावर कोरोना चाचणीचे निदान होणासाठी साधारण चार ते पाच तासांचा वेळ जातो. तो वेळ कमी करण्यासाठी व तातडीने जास्तीत जास्त नमुने तपासणीसाठी केंद्राने राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाला ७९ ‘ट्रूनॅट यंत्र’ उपलब्ध करून दिले आहे. या यंत्रावर केवळ ४० मिनिटे ते एक तासात अहवाल प्राप्त होतो. नागपूर विभागाला १८ यंत्रे मिळणार असून यातील पहिल्या टप्प्यातील ९ यंत्रे मंगळवारी उपलब्ध झाली. हे यंत्रे नागपूर महागरपालिका, नागपूर जिल्हा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला व विदर्भाबाहेरील जळगाव व नांदेड महानगरपालिका यांना दिले जाणार आहे.विदर्भात कोविड-१९चा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. सोमवारी विदर्भात रुग्णांची संख्या ६६९ तर मृतांची संख्या ३५ झाली आहे. यामुळे मोठ्या संख्येत संशयित रुग्ण आढळून येत आहेत. एकट्या नागपूरच्या संस्थात्मक अलगीकरण कक्षात २३२२ संशयित दाखल आहेत. विदर्भात नागपूरसह अकोला, वर्धा, सेवाग्राम व आता अमरावतीमध्ये चाचण्या होऊ लागल्या आहेत. परंतु संशयितांची संख्या वाढत चालल्याने प्रयोगशाळांवर तपासणीचा दबावही वाढला आहे. ‘आरटी-पीसीआर’ यंत्रावर चाचणी करण्यासाठी एका फेरीला साधारण चार तासांवर वेळ लागतो. परंतु रेड झोनमधील संशयित मृत्यू, अशा झोनमधून प्रसूतीसाठी वेळेवर आलेली संशयित गर्भवती, संशयित मृत्यू व ‘ सिव्हिअरली अ­ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’च्या रुग्णांची तातडीने तपासणी होणे गरजेचे असते, किंवा एखाद्या संशयित इमर्जन्सी रुग्णाच्या चाचणीचा अहवाल लवकर मिळणे गरजेचे असते, अशावेळी ‘ट्रूनॅट बिटा कोविड टेस्ट’ महत्त्वाची ठरते. या चाचणीला ‘आयसीएमआर’ने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या वतीने नागपूर विभागाला १८ ‘ट्रूनॅट’ यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील नऊ यंत्रे मंगळवारी उपलब्ध झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात येणारी नऊ यंत्रे भंडारा, नागपूर मनपा, वर्धा, चंद्रपूर मनपा व इतरही जिल्ह्यांना मिळणार आहेत.

-या यंत्रावर पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्याची पुन्हा तपासणीसाधारण केवळ ४० मिनिटात ‘ट्रूनॅट’ यंत्रावर कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार असल्याने जास्तीत जास्त नमुने तपासणी शक्य होणार आहे. आरोग्य यंत्रणेला पुढील नियोजन करणे शक्य होणार आहे. या यंत्रावर निगेटिव्ह आलेला अहवाल हा १०० टक्के असणार आहे, परंतु अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित नमुन्याची ‘आरटी-पीसीआर’ यंत्रावर पुन्हा तपासणी करणे आवश्यक असणार आहे.

-डागा रुग्णालयात लागणार यंत्रनागपूर सेवा मंडळाअंतर्गत नागपूर मनपा व जिल्हा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्याला प्रत्येकी एक ‘ट्रूनॅट’ यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्रावर तासाभरात अहवाल प्राप्त होत असल्याने संशयित इमर्जन्सी रुग्णांची चाचणी होऊन त्यांना तातडीने पुढील उपचार मिळतील. नागपुरात हे यंत्र डागा शासकीय स्त्री रुग्णालयात स्थापन केले जाईल.-डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस