शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे गणेशोत्सवात मिठाईची ७० टक्के विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 23:08 IST

गर्दीतून संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक निवासी सोसायट्यांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम मिठाईच्या विक्रीवर झाला असून यंदा गणेशोत्सवात लोकांची वर्दळ नसल्याने सर्वाधिक विकले जाणारे पेढे, मोदक आणि लाडूंच्या विक्रीत ७० टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास मनाई : उत्सव साधेपणाने साजरा

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा परिणाम गणेशोत्सवावर दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गर्दीतून संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक निवासी सोसायट्यांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम मिठाईच्या विक्रीवर झाला असून यंदा गणेशोत्सवात लोकांची वर्दळ नसल्याने सर्वाधिक विकले जाणारे पेढे, मोदक आणि लाडूंच्या विक्रीत ७० टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे.हॉटेल मालक म्हणाले, कोरोनामुळे गणेशोत्सवात मिठाईची विक्री कमी होण्याच्या शक्यतेने यंदा मिठाई कमी प्रमाणात तयार केली आहे. मिठाई दुधापासून तयार होते. त्यामुळे जास्त दिवस ठेवता येत नाही. खराब झाल्याने आर्थिक नुकसान होते. यंदा ग्राहक कमी प्रमाणात येत आहेत. भक्त घरी, सोसायटी वा सार्वजनिक गणेशोत्सवात प्रसाद वाटपासाठी मिठाईची खरेदी करतात. पण यावर्षी भक्तांमध्ये उत्साह नाही. सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असल्याने लोकांमध्ये निरुत्साह आहे. मंडळाचे पदाधिकारी सकाळी आणि सायंकाळी आरती करून मंडप पडद्याने झाकून ठेवतात. याशिवाय भक्तही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाण्यास उत्सुक नाहीत. या सर्व कारणांमुळे मिठाईची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे यंदा हॉटेल मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. किती कोटींचे नुकसान होईल, याची आकडेवारी उपलब्ध नाही.नागपुरात ५०० पेक्षा जास्त मिठाईची दुकाने आहेत. यंदा कोरोनामुळे हॉटेल मालकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. जास्त मिठाई तयार केली तर ती फेकावी लागेल, अशी भीती हॉटेल मालकांमध्ये आहे. यापूर्वी रक्षाबंधनसणातही मिठाई कमी प्रमाणात तयार केली होती. कच्च्या मालाचे दर वाढल्यानंतरही मिठाईचे दर वाढले नाहीत. मिठाई तयार करणारे कारागीर बाहेरगावचे असल्याने त्यांना यंदा बोलविण्यात आलेले नाही. आता हॉटेलमधील कारागीर मिठाई तयार करीत आहेत. सध्या ऑडर आल्यानंतरच मिठाई तयार करण्यात येत असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले.गणेशोत्सवात मिठाईची ३० टक्के विक्रीयंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर बॅन असल्याने भक्तांमध्ये उत्साह दिसून येत नाही. अनेक सोसायट्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीने गणेशोत्सव साजरा केला नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सव आनंदाचा उत्सव आहे. दहा दिवस लोक एकत्र येतात. यंदा कोरोनामुळे उत्साह मावळला आहे. पेढे, मोदक आणि लाडूंची विक्री कमी झाली आहे. यंदा केवळ ३० टक्के विक्रीची अपेक्षा आहे.दीपक अग्रवाल, आर्य भवन, सीताबर्डी.ऑर्डरनुसार तयार होते मिठाईपूर्वी गणेशोत्सवात मिठाईचे वेगळे काऊंटर असायचे. मोदक व पेढ्यासाठी मंडळाचे ऑडर असायचे. पण यंदा स्थिती विपरीत आहे. मंडळाचे आॅर्डर नाहीत. भक्तांनीही खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे यंदा हॉटेलमध्ये वेगळे काऊंटर लावले नाही. दुधापासून तयार होणारी मिठाई खराब होत असल्याने केवळ ऑर्डरनुसार तयार करण्यात येत आहे.राम भंडार, सी. गुप्ता, नंदनवन.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवnagpurनागपूर