शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कोरोनाने वाढविली अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 07:00 IST

यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे.

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसाधारणत: बारावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाकंडून पुढील शैक्षणिक सत्रातील नव्या प्रवेशांसाठी तयारी सुरू होते. महाविद्यालयांचा भर व्यवस्थापन कोट्याच्या जागा भरण्यावर असतो व त्यासाठी बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यावर भर असतो. परंतु यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे.‘कॅप’च्या अंतर्गत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांनाच जास्त प्राधान्य देतात. हीच बाब लक्षात घेता व्यवस्थापन ‘कोटा’मधून मिळतील तितके प्रवेश करण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न असतो. या जागा जास्तीत जास्त प्रमाणात कशा भरतील यासाठी काही महाविद्यालयांकडून बारावीच्या परीक्षेला एक ते दीड महिन्याचा अवकाश असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बैठकांचा जोर सुरू झाला होता. रिक्त जागांचे प्रमाण कमी करून प्रवेश कसे वाढतील या मुद्यावरच या बैठकांमध्ये जोर देण्यात आला. दरवर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच परीक्षांच्या अगोदरच ‘मार्केटिंग’ कसे करता येईल यासंदर्भात चाचपणीदेखील झाली होती. मात्र अचानकपणे मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला आणि महाविद्यालयांच्या आराखड्यावर पाणी फेरल्या गेले. मागील वर्षी ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त होत्या. नागपुरातील तर काही मोजक्या महाविद्यालयांतच ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले होते. त्यामुळे आता व्यवस्थापन कोट्याच्या जागा कशा भरायच्या व बाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचायचे, हा प्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर पडला आहे.

ऑनलाईन संपर्कावरच भरगेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांचे प्रतिनिधी विद्यार्थी शोधण्यासाठी चक्क उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेताना दिसून आले. सोबतच विद्यार्थ्यांना विविध ऑफर्सदेखील देण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे आता ऑनलाईन संपर्कावरच भर आहे. काही महाविद्यालयांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाºया बाहेरील राज्यांतील शिकवणी वर्गांच्या चालकांशी संपर्क साधला आहे, अशी माहिती या प्रक्रियेत असणाºया एका महाविद्यालय प्रतिनिधीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस