शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंदरची किंमत कमी होणार?
4
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
5
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
6
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
7
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
8
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
9
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
10
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
11
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
12
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
14
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
15
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
16
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
18
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
19
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
20
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा अडीच महिन्यातील उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 10:21 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या उसळीमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे५३५ नव्या रुग्णांची भर३८२ रुग्ण रुग्णालयातून परतले घरी

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची दुसरी लाट म्हणता येईल, अशा वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य पथकाने कठोर उपाययोजना करण्याचे सुचविले असले तरी मागील दोन आठवड्यात फारसा बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी रुग्णसंख्येने अडीच महिन्यातील उच्चांक गाठला. ५३५ नव्या रुग्णांची भर पडली तर, ६ रुग्णांचा जीव घेतला. रुग्णांची एकूण संख्या १३९७८८ झाली असून मृतांची संख्या ४२४२ वर पोहोचली आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या उसळीमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे. केंद्रीय पथकाच्या सूचनेनंतरही अनेक योजना कागदावरच आहेत. याचा फटका सामान्यांना बसताना दिसून येत आहे. विशेषत: हजारो विद्यार्थी शाळेत जात असल्याने पालकांमध्ये काळजी वाढली आहे. शाळेतून आजार पसरल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. मंगळवारी मागील सात दिवसांच्या तुलनेत अधिक चाचण्या झाल्या. ४०३४ आरटीपीसीआर व १३४९ रॅपिड अँटिजन मिळून ५३८५ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४८२, ग्रामीणमधील ५१ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहर, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी २ मृत्यू आहेत. ३८२ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतल्याने रुग्ण बरे होण्याचा दर ९३.८१ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत १३११४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४४०५ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून यातील १३७३ रुग्ण विविध रुग्णालयात भरती आहेत, तर ३०३२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

- नव्या रुग्णांचा भार मेयो, मेडिकल व एम्सवर अधिक

कोरोनाच्या नव्या रुग्णांचा भार मेयो, मेडिकल व एम्सवर अधिक असल्याचे दिसून येत आहे. सध्या मेडिकलमध्ये ९६, मेयोमध्ये ८०, एम्समध्ये ५३, मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयात २३, इंदिरा गांधी रुग्णालयात १४, पाचपावली कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५, लता मंगेशकर हॉस्पिटल, सीताबर्डीमध्ये २२, हिंगणामध्ये ३३ तर उर्वरित रुग्ण खासगीमध्ये उपचार घेत आहेत. शासकीयसोबतच खासगी रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

- सहा दिवसांत २७९३ रुग्ण

जिल्ह्यात मागील सहा दिवसांत २७९३ रुग्णांची भर पडली. ११ फेब्रुवारी रोजी ५००, १२ फेब्रुवारी रोजी ३१९, १३ फेब्रुवारी रोजी ४८६, १४ फेब्रुवारी रोजी ४५५, १५ फेब्रुवारी रोजी ४९८, तर १६ फेब्रुवारी रोजी ५३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी रात्री आलेल्या पावसामुळे सर्दी, खोकला व व्हायरलचे रुग्णवाढ होऊन कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडण्याची शक्यता तज्ज्ञानी वर्तवली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस