शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 08:43 IST

रविवारी शहरातील २०४२, ग्रामीणमधील २९६ तर जिल्हा बाहेरील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्देशहरातील २०४२ तर ग्रामीणमधील २९६ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णसंख्येचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. रविवारी २३४३ नव्या रुग्णांची भर पडली. रोजच्या रुग्णसंख्येतील ही विक्रमी वाढ आहे. यात शहरातील २०४२, ग्रामीणमधील २९६ तर जिल्हा बाहेरील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५२,४७१ झाली आहे. आज ४५ रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांची संख्या १६५८ वर पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण आहे. मागील आठवड्यातील ८ तारखेला २२०५ तर ११ तारखेला २०६० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीलाच यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आज ७९७३ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३४११ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी तर ४५६२ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. अ‍ॅन्टिजन चाचणीत ८३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर आरटीपीसीआर चाचणीत १५०६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.खासगी लॅबमध्ये ६३८ रुग्ण पॉझिटिव्हमहानगरपालिके ने ५०वर विविध ठिकाणी कोरोनाच्या नि:शुल्क चाचणीची सोय के ली असतानाही अनेक संशयित रुग्ण खासगी लॅबमध्ये जात आहे. आज या लॅबमधून ६३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय, एम्स प्रयोगशाळेमधून १०५, मेडिकलमधून २९९, मेयोमधून ३५०, माफसूमधून ७६, नीरीमधून ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज १७६९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९,१४९ वर पोहचली आहे. सध्याच्या स्थितीत ११६६४ रुग्ण उपचार घेत आहेत.मेडिकलमध्ये आतापर्यंत ८०४ तर मेयोमध्ये ६५६ मृत्यूकोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यात मेडिकलमध्ये ८०४, सर्वाधिक मृत्यू झाले. शिवाय, मेयोमध्ये ६५६ तर एम्समध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मृत्यूची संख्या मोठी आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस