शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात २८ नमुन्यातही कोणी कोरोना बाधित नाही : अमरावतीमधून आले २१ नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 23:32 IST

विदर्भात कोरोना प्रादुर्भावावर प्रशासनाच्या व नागरिकांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे. सलग पाचव्या दिवशी २८ नमुने निगेटिव्ह आलेत.

ठळक मुद्दे१४ दिवसानंतरच पॉझिटिव्ह रुग्णांची चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोना प्रादुर्भावावर प्रशासनाच्या व नागरिकांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे. सलग पाचव्या दिवशी २८ नमुने निगेटिव्ह आलेत. विशेष म्हणजे, यात अमरावती जिल्ह्यातून २१ नमुन्यांचा समावेश होता. गुरुवारी मेयो व मेडिकलमध्ये पुन्हा पाच संशयित रुग्ण दाखल झाले. यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) छत्तीसगड, मध्य प्रदेशासह विदर्भातून आलेले आतापर्यंत १४४ नमुने तपासण्यात आले. यात केवळ चारच नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिर असली तरी आरोग्य यंत्रणेने सुचविलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. एक चूक सर्वांना महागात पडेल, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना पाठविले घरीगुरुवारी पहिल्या टप्प्यात ३० नमुने तपासण्यात आले. यात अमरावतीचे २१, बुलडाण्यातील एक, अकोल्यातील एक, मेयोमधील एक तर मेडिकलमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. यातील २८ नमुन्यांचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यानुसार मेयोमध्ये भरती झालेल्या १० तर मेडिकलमधील पाच रुग्णांना घरी पाठविण्यात आले.मेयो, मेडिकलमध्ये पाच संशयित दाखलमेडिकलमध्ये दाखल झालेल्या तीन संशयित रुग्णांमध्ये एक ३७ वर्षीय पुरुष रुग्ण आहे. तो पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने व लक्षणे दिसून आल्याने भरती करण्यात आले. तर दुसरा २४ वर्षीय पुरुष रुग्ण आहे. काही दिवसांपूर्वी जर्मनी येथून तो नागपुरात आला. सर्दी, खोकला व तापाची लक्षणे आढळल्याने मेडिकलमध्ये दाखल केले. तिसऱ्या रुग्णाची माहिती अद्यापही मिळली नाही. मेयोमध्ये रात्री ९ वाजेपर्यंत दोन रुग्ण भरती होते.पॉझिटिव्ह रुग्णाचा दोन्ही चाचण्या निगेटिव्हमेयोमध्ये एक तर मेडिकलमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मेयोमधील पॉझिटिव्ह रुग्णाची आतापर्यंत दोनदा चाचणी करण्यात आली. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. परंतु त्यानंतरही भरती झाल्यापासून १४ दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागणार आहे. तर मेडिकलमध्ये भरती असलेल्या तीनही पॉझिटिव्ह रुग्णांचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर २४ तासांच्या अंतराने त्यांच्या चाचण्या केल्या जातील. या चाचण्या निगेटिव्ह आल्यावरच त्यांना घरी पाठविण्यात येईल.श्रीलंकेतील प्रवासी महिलेचे नमुने तपासणीसाठीश्रीलंकेतून भारत दर्शनासाठी आलेल्या ७४ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांच्या प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने कोरोना संशयित रुग्ण म्हणून त्यांची नोंद झाली आहे. गुरुवारी त्यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून रात्री उशिरा अहवाल येण्याची शक्यता आहे.व्हेंटिलेटरवरील डॉक्टरही निगेटिव्हमेडिकलमध्ये कार्यरत ३४ वर्षीय डॉक्टर कोरोना संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. नमुने तपासण्यात आले असता अहवाल निगेटिव्ह आला. परंतु बुधवारी अचानक श्वास घेण्यास कठीण झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. यामुळे आज पुन्हा नमुने तपासण्यात आले असता निगेटिव्ह आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर