शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सप्टेंबरमध्ये कोरोना झाला भयंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 07:00 IST

सात दिवसात ४९,१७४ नमुन्यांच्या तपासणीत ११,४७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. अर्थात, तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधील २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत तर याच काळात ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरूनच कोरोना संक्रमणाने उग्र रूप धारण केल्याचा अंदाज घेता येतो.

ठळक मुद्देसात दिवसात २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह४९,१७४ नमुन्यांची तपासणी११,४७७ नमुने पॉझिटिव्ह

राजीव सिंहलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना संक्रमण बेलगाम झाले आहे. सात दिवसात ४९,१७४ नमुन्यांच्या तपासणीत ११,४७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. अर्थात, तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधील २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत तर याच काळात ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरूनच कोरोना संक्रमणाने उग्र रूप धारण केल्याचा अंदाज घेता येतो.नागपुरात ११ मार्च रोजी कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर हळूहळू संसर्गाने पाय पसरण्यास सुरुवात केली. मार्च ते जून महिन्यात एकूण २४,५०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १,५०३ रुग्ण पाझिटिव्ह होते. परंतु, सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात त्या साडेतीन महिन्याच्या तुलनेत दुप्पट नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, संक्रमित रुग्णांचा आकडा सात पटींनी वाढलेला दिसून आला. ७ सप्टेंबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण ४१,०३२ रुग्णांची नोंद झाली आहे तर १,३६५ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ३ लाख ४ हजार ९१ नमुने तपासण्यात आले आणि एकूण २८,६५८ रुग्ण बरे झाले आहेत.मृत्यूदर २.७८ टक्केजिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसात ३२० संक्रमितांचा मृत्यू झाला. ६ सप्टेंबरला सर्वाधिक ५४ संक्रमितांनी प्राण सोडले तर ७ सप्टेंबरला ५० संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. सात दिवसात मिळालेल्या पॉजिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूच्या आकड्यांचा विचार केला तर मृत्यूदर २.७८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जून महिन्यापर्यंत हा दर १ टक्क्यापेक्षाही कमी होता. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस