शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ४४ हजारावर कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:42 IST

जिल्ह्यात (ग्रामीण भागात) आतापर्यंत ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असून, यात २७,०४५ अ‍ॅन्टीजेन टेस्ट तर १७,८९८ आरटीपीसीआर टेस्ट आहेत. यापैकी ३,३७५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी ठाकरे यांचे आवाहन : घाबरू नका तपासणी करून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात (ग्रामीण भागात) आतापर्यंत ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असून, यात २७,०४५ अ‍ॅन्टीजेन टेस्ट तर १७,८९८ आरटीपीसीआर टेस्ट आहेत. यापैकी ३,३७५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी आजवर ७२ वर मृत्यू झाले आहेत. परंतु या मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे वेळीच निदान न होणे, उशिरा तपासणी करणे आदी कारणांमुळे झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीस जर कोविड-१९ ची लक्षणे दिसून येत असल्यास त्यांनी घाबरून न जाता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुरुवारी केले.ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ग्रामीण भागामध्ये निरंतर सर्वे सुरू आहे. तीन स्तरावर पथक तैनात करण्यात आले आहे. ६० ते ७० घरामागे एक कर्मचारी तैनात आहे. आठ हजारावर लोक या कामात आहेत. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ८५० सुपरवायझर आहेत. या माध्यमातून लक्षणे असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन तपासणी केली जात आहे. त्यातूनही तपासणी वाढल्या आहेत. दररोज वरिष्ठ पातळीवर या सर्व कामांची मॉनिटरिंग होत आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे कामठी शहरामध्ये आढळून आले आहेत. पूर्वी येथे नागरिक प्रशासनाला साद देत नसल्यामुळे येथील रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी, धर्मगुरू आदींना सोबत घेत जनतेला कोरोना तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रत्येक तालुक्याचा दौरा करून लोकप्रतिनिधी व स्थानिक डॉक्टरांना सोबत घेऊन लोकांना आवाहन केले जात आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी मिळून त्याचा विरोध कराग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याबाबतचा चुकीचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होईलच; परंतु आपण सर्वांनी मिळून अशा अफवांचा विरोध करावा, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे आणि जि.प.चे सीईओ कुंभेजकर यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर